Rohit Sharma Retirement: संघातून बाहेर करण्याबाबत अखेर रोहितने मौन सोडले; निवृत्तीबाबत केला मोठा खुलासा

Rohit Sharma On Retirement: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला सिडनी कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान निवृत्तीच्या चर्चा सुरु असताना, रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.
Rohit Sharma Retirement: संघातून बाहेर करण्याबाबत अखेर रोहितने मौन सोडले; निवृत्तीबाबत केला मोठा खुलासा
rohit sharmatwitter
Published On

भारताचा कर्णधार रोहित शर्मा निवृत्त होणार,अशी जोरदार चर्चा सुरु आहे. पाचव्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्मा आपला शेवटचा कसोटी खेळणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर रोहितला पाचव्या कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर रोहितने कसोटी क्रिकेटला रामराम केला असल्याची चर्चा आणखी वाढली. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहितने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रोहितने आपल्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.

निवृत्तीबाबत बोलताना काय म्हणाला रोहित शर्मा? Rohit sharma on Retirement

सिडनी कसोटीतील दुसऱ्या दिवशी लंचब्रेक दरम्यान रोहितने स्टार स्पोर्ट्सच्या ब्रॉडकास्टर्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे. यासह रोहितने आपल्या भविष्याचा प्लानही सांगितला आहे. रोहितने सांगितलं की, खराब फॉर्ममुळे त्याने या सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

Rohit Sharma Retirement: संघातून बाहेर करण्याबाबत अखेर रोहितने मौन सोडले; निवृत्तीबाबत केला मोठा खुलासा
IND vs AUS: Snicko की जय हो..! आधी राहुल, जयस्वाल अन् आता सुंदर; आऊट नसतानाही जावं लागलं बाहेर?

रोहित शर्मा म्हणाला, ' मी निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही. मी या खेळापासून दूर जात नाहीये. मी फलंदाजीत धावा करताना संघर्ष करतोय. त्यामुळे मी या सामन्यात विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे.'

Rohit Sharma Retirement: संघातून बाहेर करण्याबाबत अखेर रोहितने मौन सोडले; निवृत्तीबाबत केला मोठा खुलासा
IND vs AUS: नॉर्मल वाटलोय का.. कॉन्टास पुन्हा एकदा नडला, मग बुमराहने पुढच्याच बॉलवर असा काढला राग - VIDEO

तसेच तो पुढे म्हणाला की, 'याची कोणतीही हमी नाही की मी २ महिन्यांनी किंवा ५ महिन्यांनी धावा करू शकेन. मी खूप क्रिकेट पाहिलं आहे. प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक दिवस जीवन बदलत असतं. माझा विश्वास आहे की गोष्टी बदलतील, परंतु त्याच वेळी मला वास्तववादीही राहायला हवं. समालोचन करत बसलेले लोक किंवा हातात लॅपटॉप घेऊन लिहिणारे लोक हे ठरवणार नाहीत की माझं भविष्य कसं असेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com