Ind vs Aus Semi Final Match X (Twitter)
Sports

Champions Trophy 2025 : रोहित सेना काळी पट्टी बांधून का उरतलीये मैदानात? हे आहे खरं कारण

Ind vs Aus Semi Final Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताच्या संघातील प्रत्येक खेळाडूने हातावर काळी पट्टी बांधली आहे.

Yash Shirke

Ind Vs Aus Match : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील सामना सुरु आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टीम इंडिया मैदानात उतरली. टॉसच्या वेळी रोहित शर्माने हाताला काळी पट्टी बांधली होती. रोहितसह टीम इंडियातील सर्व खेळाडूंनीही हाताला काळी पट्टी बांधल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघाने सामन्यात काळी पट्टी भारताचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बांधली आहे. काल पद्माकर शिवलकर यांचे निधन झाले. ८४ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शिवलकर हे फिरकीपटू होते. १९६१-६२ पासून १९८७-८८ पर्यंत १२४ प्रथम श्रेणीतील सामने त्यांनी मुंबईकडून खेळले होते.

भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयद्वारे २०१७ मध्ये पद्माकर शिवलकर यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २२ व्या वर्षी त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. वयाच्या ४८ व्या वर्षापर्यंत शिवलकर क्रिकेट खेळत होते. एकूण कारकीर्दीत त्यांनी १२४ सामन्यांमध्ये १९.६० च्या सरासरीने ५८९ विकेट्स घेतल्या होत्या.

'पद्माकर शिवलकर यांचे निधन झाले आहे. मुंबईच्या संघाने आज एक खरा दिग्गज गमावला आहे. पद्माकर शिवलकर सरांचे खेळातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. सर्वोत्कृष्ट फिरकीपटू म्हणून सदैव स्मरणात राहील' असे विधान मुंबई क्रिकेट संघाचे अध्यक्ष अजिंक्य नाइक यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT