IND vs Aus google
Sports

IND vs AUS: भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चारली धूळ

Ind vs Aus MCG second T20 Australia Beat India: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळला गेला. पहिल्या सामन्यात पावसाने खोळंबा घातल्यानंतर सामना रद्द करण्यात आला. यानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड एससीजी येथे रंगला. यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले. कांगारुंनी फक्त १३.२ ओव्हरमध्ये लक्ष्य गाठत भारताचा दारुण पराभव केला.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चारली धूळ

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने तुफानी सुरुवात केली. सलामीसाठी आलेले ट्रॅविस हेड आणि मिशेल मार्शने पहिल्या विकेटसाठी ५१ धावा जोडले. तुफान फटकेबाजी करत हेडने १५ बॉल्समध्ये २८ धावा केल्या. तर कर्णधार मार्शने २६ बॉल्समध्ये ४६ धावा केल्या. जोश इंग्लिसने २० बॉल्समध्ये २० धावा केल्या तर मिशेल ओवनने १० बॉल्समध्ये १४ धावा केल्या. हेड आणि मार्शच्या वादळी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने आरामात लक्ष्य गाठले आणि सामना जिंकला. भारताकडून जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवतीने प्रत्येकी २ विकेट्स घेतले.

टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवात केली. जोश हेझलवूडने शुभमन गिलला फक्त ५ धावांवर बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला संजू सॅमसन २ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर हेझलवूडने कर्णधार सूर्यकुमार यादव १ धावांवर आणि तिलक वर्माला शून्यावर बाद करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

अक्षर पटेल देखील फक्त ७ धावांवर धावबाद झाला. ४९ धावांत ५ विकेट गमावल्यानंतर, अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा यांनी सहाव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करत बारताचा डाव सावरला. या भागीदारीदरम्यान अभिषेकने २३ बॉल्समध्ये ७ चौकार आणि एक षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले.तर, हर्षितने ३३ बॉल्समध्ये ३ चौकार आणि एक षटकार मारत ३५ धावा केल्या. हर्षितच्या विकेटनंतर, शिवम दुबे ४ धावा, आणि कुलदीप यादव शून्यावर परतले. भारताने १८.४ ओव्हरमध्ये १२५ धावा केल्या.

दोन्ही संघाचा प्लेइंग ११

भारतीय संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया संघ : ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), जोश इंगलिस, टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅट कुनहेमन, जोश हेझलवुड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IPS; सृष्टी मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

LPG Cylinder Price :एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, तुमच्या शहरात दर किती? वाचा

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT