Rohit sharma and virat kohli saam tv
Sports

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

ind vs aus Rohit-Virat comeback update perth rain threat : भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात १९ ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कमबॅकमुळं या सामन्याला महत्व प्राप्त झालं आहे. पण त्यांचं कमबॅक लांबण्याची शक्यता आहे. या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Nandkumar Joshi

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये उद्या, रविवारी (19 ऑक्टोबर) रोजी वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेचा पहिला वनडे सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय आणि ऑस्ट्रेलियाच्याही क्रिकेट चाहत्यांसाठी खास आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली कमबॅक करणार आहेत. तर शुभमन गिल हा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. विराट आणि रोहित हे दोघेही जवळपास ७ महिन्यांनी भारताकडून खेळताना दिसणार आहेत. या दोघांच्या कमबॅकची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पण त्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांवर 'पाणी' फेरणारी माहिती आली आहे.

सामन्याच्या आदल्या दिवशीच टेन्शन वाढलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचं संकट घोंघावत आहे. एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, पर्थमध्ये रविवारी पावसाची ६३ टक्के शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार, सामना ११.३० वाजता सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, सामना सकाळी ९ वाजता सुरू होईल. पण या वेळेला पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ५० ते ६० टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जर अंदाज खरा ठरला तर, सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. याशिवाय पावसामुळं सामना रद्द झाला तर, रोहित-विराटचं कमबॅक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

९ वर्षांनंतर रोहित आणि विराट...

रोहित शर्मा हा ४ वर्षांनंतर भारतीय संघासाठी फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. २०२१ मध्ये विराटच्या जागी वनडेचा कर्णधार केलं होतं. तर त्याआधी विराट कोहलीनं ही जबाबदारी बरीच वर्षे सांभाळली होती. रोहित आणि विराट हे दोघे नऊ वर्षांनंतर खेळाडू म्हणून एकत्र खेळताना दिसणार आहेत. ते शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणार आहेत. याआधी हे दोघे २०१६ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले होते.

दुसरीकडे, भारतीय संघ या मैदानावर पहिल्यांदाच वनडे सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ३ सामने खेळले आहेत. त्या तिन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. हीच टीम इंडियासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात त्यांच्या विरोधात भारतीय संघाचा रेकॉर्ड खराब आहे. भारताने ५४ सामन्यांत फक्त १४ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ३८ सामन्यांत पराभव झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Elections : मतदानाआधीच उधळला विजयी गुलाल! मलकापूरमध्ये भाजपचे एकाच वेळी ५ उमेदवार बिनविरोध

Prajakta Mali Photos: अस्सल मराठमोळं सौंदर्य, प्राजक्ताच्या लेटेस्ट फोटोशूटने केलं सर्वांनाच घायाळ

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

SCROLL FOR NEXT