Rohit Sharma celebrates his 33rd ODI century against Australia in Sydney — his 50th international ton overall. saam tv
Sports

Rohit Sharma: निवृत्तीच्या चर्चेदरम्यान रोहितचं वादळ; ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं, झळकावलं ३३ वं शतक

Rohit Sharma Creates History: सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावले.

Bharat Jadhav

  • भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात रोहित शर्माचं शानदार शतक

  • एकदिवसीय क्रिकेटमधील ३३वं शतक

  • सचिन आणि विराटनंतर हा टप्पा गाठणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरलाय.

सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. या शतकसह रोहितने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधून रोहित शर्माचं हे ५० वे शतक आहे. रोहित सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनंतर हा टप्पा गाठणारा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे. दरम्यान रोहित शर्माचे एकदिवशीय क्रिकेटमधील हे ३३ वं शतक आहे.

सिडनीच्या क्रिकेट मैदानावर आज ऑस्ट्रेलिया आणि भारतविरुद्धचा तिसरा एकदिवशीय सामना खेळला जातोय. या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितनं १०५ चेंडूत शानदार शतक ठोकलं. अॅडलेडमध्ये शानदार ७३ धावा करणाऱ्या रोहितने सिडनीमध्ये शानदार फलंदाजी करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं.

रोहित शर्माने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता एकदिवशी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. दमरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपद काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे रोहित शर्माच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज अखेरच्या तिसऱ्या एकदिवशी सामन्यात रोहित धमाकेदार खेळी केली. सिडनीमध्ये केलेल्या तुफानी खेळीमुळे सर्व चर्चांना रोहितनं सीमेपार लोटलं.

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धात नेहमीच धमाकेदार खेळी खेळलीय. ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शर्माने ९ शतकं केली आहेत. यात रोहितने सचिन तेंडुलकरची बरोबर केलीय. यासह रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धात सर्वाधिक शतक करणारा फलंदाज बनलाय. रोहितने ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर ६ वेळा शतकी खेळी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT