jasprit bumrah  twitter
Sports

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहचा कहर! ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; कपिल देव यांना सोडलं मागे

Jasprit Bumrah Breaks Kapil Dev Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने कपिल देव यांना मागे सोडलं आहे

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी २७५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला ५४ षटकात पूर्ण करायचं.

आता भारतीय संघ सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार की, सामना ड्रॉ करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या डावात गोलंदाजी करताना, जसप्रीत बुमराहने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर आकाश दीप आणि मोहम्मद सिराने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. बुमराहने तिसरा गडी बाद करताच या मालिकेत २० गडी पूर्ण केले आहेत.

यासह तो एकाच मालिकेत सर्वाधिक वेळेस २० पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. बुमराहने हा कारनामा तिसऱ्यांदा करुन दाखवला आहे. तर भारताचे माजी खेळाडू कपिल देव या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.

एकाच मालिकेत गोलंदाजी करताना, सर्वाधिक वेळेस २० पेक्षा अधिक गडी बाद करणारे गोलंदाज

जसप्रीत बुमराह -३ वेळेस

कपिल देव - २ वेळेस

इरफान पठाण - १ वेळेस

इशांत शर्मा - १ वेळेस

जसप्रीत बुमराहने या मालिकेत दमदार गोलंदाजी केली आहे. या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीतही बुमराह अव्वल स्थानी आहे. मुख्य बाब म्हणजे. बुमराहने हा कारनामा परदेशात खेळताना करुन दाखवला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत सर्वाधिक २३ गडी बाद केले होते.

परदेशात खेळताना कसा राहिलाय बुमराहचा रेकॉर्ड?

२१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१८-१९)

२३ विरुद्ध इंग्लंड ( २०२१-२२)

२३ विरुद्ध इंग्लंड (२०२१-२२)

२० विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( २०२४-२५)

ऑस्ट्रेलियात असा रेकॉर्ड करणारा पहिलाच गोलंदाज

बुमराहने या मालिकेत २० पेक्षा अधिक गडी बाद केले. यासह त्याने ऑस्ट्रेलियात खेळताना सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

बुमराह ५३ गडी बाद करत ऑस्ट्रेलियात खेळताना सर्वाधिक गडी बाद करणारा आशियातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने कपिल देव यांना मागे सोडलं आहे. कपिल देव यांच्या नावे ५१ गडी बाद करण्याची नोंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT