Jasprit Bumrah: भारताची बुमराह एक्स्प्रेस! एकाच झटक्यात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा रेकॉर्ड

IND vs AUS 3rd Test, Jasprit Bumrah Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत बुमराहने कपिल देव यांचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
Jasprit Bumrah: भारताची बुमराह एक्स्प्रेस! एकाच झटक्यात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा रेकॉर्ड
jasprit bumrah twitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबामध्ये सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केली.

त्यामुळे अवघ्या १३ षटकांचा खेळ होऊ शकला. तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. एकीकडून ऑस्ट्रेलियाचे फलंदाज तुफान फटकेबाजी करत होते.

तर दुसरीकडे भारताकडून एकटा जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाला नडला. त्याने या डावात गोलंदाजी करताना मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यादरम्यान त्यांनी कपिल देव यांचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Jasprit Bumrah: भारताची बुमराह एक्स्प्रेस! एकाच झटक्यात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा रेकॉर्ड
IND vs AUS: गाबा टेस्टमध्ये रोहित शर्माला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडूला दुखापत, मैदानही सोडावं लागलं

जसप्रीत बुमराहच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

या सामन्यातील दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना एकटा जसप्रीत बुमराह चमकला. त्याने या डावात गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या मुख्य फलंदाजांना आपल्या गतीच्या जाळ्यात अडकवलं. त्याने मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ सारख्या फलंदाजांना माघारी धाडलं.

या डावात त्याने ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला. या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही बुमराह नंबर १ स्थानी आहे. यासह आशियाच्या बाहेर गोलंदाजी करताना सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. बुमराहने गोलंदाजी करताना दहाव्यांदा हा कारनामा करुन दाखवला आहे. तर कपिल देव यांनी ९ वेळेस असा कारनामा केला होता.

Jasprit Bumrah: भारताची बुमराह एक्स्प्रेस! एकाच झटक्यात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा रेकॉर्ड
IND vs AUS: BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय! मालिका सुरु असतानाच 3 खेळाडू मायदेशी परतणार

यासह जसप्रीत बुमराहच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा करणारा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

बुमराहने आतापर्यंत १२ वेळेस हा कारनामा केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा कपिल देव यांच्या नावावर आहे.

कपिल देव यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण २३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. आता बुमराह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर जहीर खान तिसऱ्या स्थानी आहे. जहीर खानने हा कारनामा ११ वेळेस केला आहे.

Jasprit Bumrah: भारताची बुमराह एक्स्प्रेस! एकाच झटक्यात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा रेकॉर्ड
IND vs AUS 3rd Test: गाबा कसोटीवर पावसानं फेरलं पाणी! दुसऱ्या दिवशी आणखी लवकर सुरु होणार सामना

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार फटेकबाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने फलंदाजी करताना सर्वाधिक १५२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने १०१ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ४०५ धावांवर पोहोचवली.

Jasprit Bumrah: भारताची बुमराह एक्स्प्रेस! एकाच झटक्यात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा रेकॉर्ड
IND vs AUS 3rd Test: ब्रिस्बेनमध्ये पावसाचा खेळ चाले! एकाच सेशनमध्ये दोनदा थांबवावा लागला सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com