Rohit sharma twitter
Sports

Travis Head Catch: हेड नेहमीच टीम इंडियाला नडतो! 'कॅच ऑफ द टूर्नामेंट' पकडून रोहितला धाडलं माघारी, Video

Ind vs Aus , World Cup Final 2023: या सामन्यात ट्रेविस हेडने रोहितचा भन्नाट झेल टिपला आहे.

Ankush Dhavre

India vs Australia, Rohit Sharma Wicket Video:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. जगातील सर्वात मोठ्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र कर्णधारी रोहित शर्मा अवघ्या ४७ धावा करत माघारी परतला. दरम्यान ट्रेविस हेडने अप्रतिम झेल पकडून त्याला बाद करत माघारी धाडलं आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाला नाणेफेक जिंकून फलंदाजीच करायची होती.

नाणेफेक गमावूनही फलंदाजी करण्याची संधी मिळाली. डावाची सुरुवात करताना शुभमन गिल अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. गिल बाद होऊनही रोहितची तुफानी फटकेबाजी सुरुच होती. त्याने चौकार आणि षटकार मारत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. दरम्यान अर्धशतकापासून ३ धावा दुर रोहित शर्मा झेलबाद होऊन माघारी परतला. (Rohit sharma wicket video)

तर झाले असे की, रोहित शर्मा फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजीला आला होता. मॅक्सवेल गोलंदाजीला येताच रोहितने हल्लोबोल करायला सुरुवात केली. त्याने स्टेपआऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फटका फसला, चेंडू बॅटचा कडा घेत हवेत गेला. त्यावेळी ट्रेविस हेडने मागच्या बाजूला धावत डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला. (Latest sports updates)

ट्रेविस हेड हा भारतीय संघाला नेहमीच नडतो. यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही त्याने भारतीय संघाविरुद्ध १६३ धावांची महत्वाची खेळी केली होती. त्याने १७४ चेंडूंचा सामना करत २५ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १६३ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने मोहम्मद सिराजने त्याला झेलबाद करुन माघारी धाडलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT