IND VS AUS saam tv
Sports

IND VS AUS: शेवटच्या दोन टेस्ट आणि वनडे सीरीजसाठी भारतीय संघ जाहीर, पहिल्या वनडेतून रोहित आऊट

IND VS AUS: बीसीसीआयने शेवटचे दोन कसोटी सामने आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Chandrakant Jagtap

IND VS AUS: बीसीसीआयने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांसाठी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड केली आहे.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे अनुपलब्ध राहणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघ पहिला सामना खेळणार आहे. (Sports News)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे उर्वरीत दोन सामने १ ते ५ मार्चदरम्यान इंदूरमध्ये आणि ९ ते १३ मार्चदरम्यान अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. या दोन सामन्यासाठी बीबीसीआयने संघ जाहीर केला आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव , रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्चपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना १७ मार्चला मुंबईमध्ये, दुसरा सामना १९ मार्चला विशाखापट्टणम येथे तर तिसरा सामना २२ मार्चरोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 200 वर्षांनी मकर संक्रातीला बनणार त्रिग्रही राजयोग; या राशींच्या व्यक्तींना मिळणार धनदौलत आणि राजेशाही सुख

Thackeray Brothers : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण! आज दुपारी 12 वाजता घोषणा, ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे होणार?

New Rules 2026: १ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Mahapalika Election : एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे ४ वाजेपर्यंत बैठक, राज्यातील जागावाटपावर शिक्कामोर्तब?

SCROLL FOR NEXT