team-india saam tv news
क्रीडा

IND vs AUS 5th T20I weather update: भारत की ऑस्ट्रेलिया? बंगळुरुत कोण मारणार बाजी? वाचा खेळपट्टी ते हवामानापर्यंत सर्व माहिती

Ankush Dhavre

Match Preview / prediction - India vs Australia 5th T20I:

बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना रंगणार आहे. भारतीय संघाने या मालिकेतील ३ सामने जिंकून ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर २० धावांनी विजय मिळवला होता. आता सर्वांचं लक्ष पाचव्या टी -२० सामन्यावर असणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? आणि खेळपट्टी कोणासाठी ठरेल फायदेशीर? जाणून घ्या.

भारत - ऑस्ट्रेलिया पाचव्या टी -२० सामन्यातील हवामानाचा अंदाज.. (ind vs aus 5th T20I weather prediction)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पाचव्या टी -२० सामन्यादरम्यान संध्याकाळच्यास वेळी ढगाळ वातावरण असेल. Accuweather.com च्या अहवालानुसार, तापमान २२ अंश ते २५ अंश सेल्सिअसच्या मध्ये असेल. पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता नसल्याने क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.

पिच रिपोर्ट..

या मैदानावर आतापर्यंत ८ आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेतील बहुतांश या सामने या मैदानावर खेळवले गेले आहेत. त्यामुळे या मैदानावरील रेकॉर्ड पाहता ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरली आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी ३०० धावांचा आकडा सहज गाठला आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग करताना ५ संघांनी विजय मिळवला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना २ संघांना विजय मिळवता आला आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रिंकू सिंग/शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT