stadium twitter
Sports

IND vs AUS: पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द! दुसऱ्या दिवशी कसं असेल हवामान?

India vs Australia 3rd Test, Weather Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीतील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहे. या मैदानावर क्रिकेट चाहत्यांना ५ दिवस अॅक्शन पॅक क्रिकेट पाहायला मिळणार असं वाटलं होतं. मात्र पहिल्याच दिवश पावसाने मुसंडी मारली.

सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला आहे. हा सामना सकाळी सुरु होता, मात्र काळोख इतका होता की, रात्र झाल्यासारखं वाटत होतं. पावसामुळे पहिल्या दिवशी अवघ्या १३.२ षटकांचा सामना होऊ शकला. त्यानंतर सततच्या पावसामुळे दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला बिनबाद २८ धावा करता आल्या आहेत. दरम्यान दुसऱ्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.

दुसऱ्या दिवशी कसं असेल हवामान?

पहिला दिवस पावसामुळे धुतला गेल्यानंतर, दुसऱ्या दिवसाआधी क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज आहे. दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. हवामान खात्याचा अंदाज देणाऱ्या सांकेतिक स्थळाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ब्रिस्बेनमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही केवळ ८ टक्के इतकी असणार आहे.

मात्र संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण असेल. पाऊस पडण्याची शक्यता जरी कमी असली, तरीदेखील मध्ये मध्ये पावसामुळे अडथळा येऊ शकतो. साामन्याच्या दुसऱ्या दिवशी हवेचा वेग ताशी १५ किमी इतका असेल.

ब्रिस्बेनमध्ये पहिल्या दिवशी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. मात्र गाबाच्या मैदानावरील ड्रेनेज सिस्टम हे विश्वस्तरीय आहे. जर उशिरा रात्रीपर्यंत पाऊस पडला, तर मग दुसऱ्या दिवशी अडथळा निर्माण होऊ शकतो.

पहिल्या दिवशी जवळ जवळ ७७ षटकांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. ही षटकं भरुन काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT