Rohit sharma S
Rohit sharma S Saam tv
क्रीडा | IPL

Ind vs Aus 3rd Test: इंदूरच्या खेळपट्टीवरून गदारोळ का? समजून घ्या ५ पॉइंट्समधून

Ankush Dhavre

Ind vs aus 3rd test Indore pitch: ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणं आणि खेळपट्टीवरून वाद होणं हे खूप जुनं समीकरण आहे. यापूर्वी देखील अनेकदा असे चित्र पाहायला मिळाले आहे.

नुकताच भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरु आहे. या मैदानावरील खेळपट्टीमुळे पुन्हा एकदा खेळपट्टीचा नवा वाद पेटला आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी म्हटले आहे की, इंदोरची खेळपट्टी ही कसोटी सामन्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने स्पष्टच म्हटले की, इंदूर कसोटी सामन्याचा निकाल एका दिवसात लागेल. आता प्रश्न असा उपस्थित झाला आहे की, इंदूरच्या खेळपट्टीमुळे इतका गडरोड का? चला समजून घेऊ.

१) इंदूरच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसाच्या पहिला सत्रात चेंडू जरा जास्तच फिरत असल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्या हंगामात चेंडू ४.८ डिग्री इतका फिरत होता. तर नागपूर कसोटीत २.५ डिग्री तर दिल्ली कसोटीत चेंडू ३.५ डिग्री इतका फिरत होता.

२)रोहित शर्मा ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू ८.३ डिग्री इतका फिरला. तर शुभमन गिल ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू ५.९ डिग्री इतका फिरला. तर चेतेश्वर पुजारा ज्या चेंडूवर माघारी परतला. तो चेंडू ६.८ डिग्री इतका फिरला. तर श्रेयस अय्यरचा चेंडू ३.५ डिग्री इतका फिरला यासह चेंडू खाली देखील राहिला.

३)तसेच भारतीय संघाचा डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला. या खेळपट्टीवर भारतीय संघातील मुख्य फलंदाज रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर सारखे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले आहे. भारताच्या एकही फलंदाजाला ३० धावांचा पल्ला देखील गाठता आला नाही.

४)इंदूरच्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी तडे गेल्याचे पाहायला मिळाले. खेळपट्टीवर चेंडू पडताच हे तडे आणखी वाढत असल्याचे पाहायला मिळाले. खेळपट्टी पाहता ऑस्ट्रेलियन कर्णधाराने फिरकी गोलंदाजांना ६ व्या षटकात गोलंदाजीसाठी बोलावले.

५) भारतीय संघाचा डाव अवघ्या ३३ षटकांमध्ये संपुष्ठात आला. या कारणामुळे देखील इंदूरच्या खेळपट्टीवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT