JASPRIT BUMRAH twitter
Sports

IND VS AUS, Day 4: शेपटानं लाज राखली, कांगारुंना झोडलं! बुमराह- आकाशदीपने फॉलोऑन टाळला

Jasprit Bumrah- Akash Deep: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट होतं. मात्र आकाशदीप आणि जसप्रीत बुमराहने

Ankush Dhavre

ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट होतं. संघातील सर्वच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. हा सामनाही हातून गेला, असं चित्र दिसत असताना उपकर्णधार जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने भारतीय संघाला फॉलो ऑनपासून वाचवलं आहे.

ज्यावेळी ९ वा विकेट पडला त्यावेळी त्यावेळी भारतीय संघाला ३३ धावा आणखी करायच्या होत्या. या धावा बुमराह आणि आकाश दीपच्या जोडीने ३९ धावा जोडल्या आणि भारताला फॉलोऑनपासून वाचवलं आहे.

चौथ्या दिवसाखेर भारताने ९ गडी बाद २५२ धावा केल्या आहेत. आकाश दीप २७ तर बुमराह १० धावांवर नाबाद आहे.

या सामन्यातही भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना, ४४५ धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी २४६ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाने आतापर्यंत २५२ धावा केल्या आहेत.

बुमराह - आकाश दीपची भागीदारी

गोलंदाजीत संघाचा भार उचलणाऱ्या बुमराहने या सामन्यात फलंदाजीतही बहुमूल्य योगदान दिलं. शेवटच्या विकेटसाठी दोघांनी मिळून ३९ धावा जोडल्या आहेत. बुमराह १० तर आकाश दीप २७ धावांवर नाबाद आहे.

राहुल- जडेजा लढले

केएल राहुलने केवळ या सामन्यातच नव्हे, तर संपू्र्णय दौऱ्यावर फलंदाजीत योगदान दिलं आहे. या डावातही एका बाजूने विकेट्स जात होते, तर एका बाजूने केएल राहुल खिंड लढवत उभा होता. त्याने या डावात फलंदाजी करताना ८४ धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या १६ धावांनी हुकलं. त्यानंतर रविंद्र जडेजाने ७७ धावांची खेळी करत संघाला २०० पार पोहोचवलं.

टॉप ऑर्डर फ्लॉप

मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडून हवं तितंक योगदान मिळालेलं नाही. पहिल्या कसोटीचील शतकी खेळी वगळली, तर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये यशस्वी जयस्वाल फ्लॉप ठरला आहे.

तर शुभमन गिललाही हव्या तितक्या धावा करता आलेल्या नाहीत. टॉप ऑर्डरमध्ये विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र पर्थ कसोटीतील शतकी खेळीनंतर त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही.

ऑस्ट्रेलियाने केल्या ४४५ धावा

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करतान ट्रेविस हेड पुन्हा एकदा चमकला. गेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. या सामन्यातही त्याने १५२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने १०१ धावा केल्या. शेवटी अॅलेक्स कॅरीने फलंदाजी करताना, ७० धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT