Ind vs Aus 3rd Test 1st inning: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामान्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूणर्पणे फसल्याचे दिसून आले आहे.
भारतीय संघाला पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ७ गडी बाद ८७ धावा करता आल्या आहेत. या डावात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाहीये.
भारतीय फलंदाजांची फ्लॉप कामगिरी..
या सामन्यात केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. मात्र त्याला या संधीचा लाभ घेता आला नाहीये. तो अवघ्या २१ धावा करत माघारी परतला. तर रोहित शर्मा १२, विराट कोहली २२, चेतेश्वर पुजारा १, रवींद्र जडेजा ४, श्रेयस अय्यर ० आणि केएस भरत अवघ्या १७ धावा करत माघारी परतला.
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारत :
रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया :
उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पिटर हँड्सकाँब, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हेमन
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.