Team india twitter
Sports

IND vs AUS 2nd Test: हेडचं शतक, बुमराह - सिराजचा विकेट्सचा चौकार! ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी

India vs Australia 2nd Test, 1st Inning: भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा पहिला डाव १८० धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ३३७ धावांचा डोंगर उभारला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने १५७ धावांची आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने उभारला ३३७ धावांचा डोंगर

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. उस्मान ख्वाजा (१३) धावांवर माघारी परतला. त्यानंतर मॅकस्विनी (३९) धावांवर माघारी परतला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्नस लाबुशेनने (६४) धावांची खेळी केली. ट्रेविस हेड ऑस्ट्रेलियाचा हिरो ठरला. हेडने १४१ चेंडूंचा सामना करत (१४१) धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला ३३७ धावा करता आल्या. यासह ऑस्ट्रेलियाने १५७ धावांची आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, जसप्रीत बुमराहने ६१ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने ९८ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. तर नितीश कुमार रेड्डी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

भारतीय संघाने केल्या १८० धावा

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना, नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक (४२) धावांची खेळी केली. तर केएल राहुलने (३७), शुभमन गिलने (३१), आर अश्विनने (२२) आणि रिषभ पंतने (२१) धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jio Home Offer: Jio ची जबरदस्त ऑफर! ६० दिवस मोफत इंटरनेट, १००० टीव्ही चॅनेल आणि OTT अ‍ॅप्स फ्री

Manmad : नगर- मनमाड महामार्गावर अग्नितांडव, हार्वेस्टर वाहनाला भीषण आग |VIDEO

SCROLL FOR NEXT