Arul Jetley stadium  BCCI
क्रीडा

IND vs AUS 2nd Test : भारत की ऑस्ट्रेलिया दिल्लीत कोण मैदान मारणार? वाचा अरुण जेटली स्टेडियमचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स

साम टिव्ही ब्युरो

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर उद्या म्हणजे 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाईल. या मैदानावर आतापर्यंत 34 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये  टीम इंडिया  समावेश आहे.

भारताने 34 सामन्यांपैकी 13 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धही भारतीय संघ या मैदानावर 7 सामने खेळला आहे, ज्यात तीन जिंकले आहेत आणि एक पराभव पत्करावा लागला आहे.या मैदांनाची खास आणि इंटरेस्टिंग माहिती जाणून घेऊया.

अरुण जेटली स्टेडियमचे माहिती

>> संघाची सर्वोच्च धावसंख्या: वेस्ट इंडिजने फेब्रुवारी 1959 मध्ये येथे भारताविरुद्ध 8 विकेट गमावून 644 धावा केल्या होत्या.

>> संघाची सर्वात कमी धावसंख्या: भारतीय संघ नोव्हेंबर 1987 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 75 धावांत सर्वबाद झाला होता.

>> सर्वात मोठा विजय: ऑस्ट्रेलियाच्या संघाने डिसेंबर 1959 मध्ये या मैदानावर भारताचा एक डाव आणि 127 धावांनी पराभव केला होता.

>> सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकरने दिल्लीतील या मैदानावर 10 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 759 धावा केल्या आहेत.

>> सर्वोत्तम खेळी: विराट कोहलीने डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 243 धावा केल्या.

>> सर्वाधिक शतके: दिलीप वेंगसरकर यांनी येथे 8 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 4 शतके झळकावली आहेत. (Sports News)

>> सर्वाधिक विकेट्स: भारतीय अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेने येथे 7 सामन्यांच्या 14 डावांमध्ये 58 विकेट्स घेतल्या आहेत.

>> सर्वोत्तम गोलंदाजी खेळी: फेब्रुवारी 1999 मध्ये अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या होत्या.

>> सर्वोच्च भागीदारी: मुरली विजय आणि विराट कोहली यांनी या मैदानावर डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी 283 धावांची भागीदारी केली होती.

>> सर्वाधिक सामने: सचिन तेंडुलकरने या मैदानावर 10 कसोटी सामने खेळले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT