mohammed siraj twitter
Sports

Mohammed Siraj: सिराज तापला ना राव! रागात लाबुशेनच्या दिशेने बॉल मारुन फेकला; पाहा VIDEO

Mohammed Siraj Marnus Labuschagne: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना, मोहम्मद सिराजने मार्नस लाबुशानला बॉल मारुन फेकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मार्नस लाबुशेन आणि मॅकस्विनीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

सिराज- लाबुशेन भिडले

तर झाले असे की, भारतीय संघाकडून २५ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचवा चेंडू टाकण्यापूर्वी असं काही घडलं, ज्यामुळे मोहम्मद सिराज भडकला. मोहम्मद सिराज धावत गोलंदाजील आला.

तो चेंडू रिलीज करणार इतक्यात लाबुशेनने त्याला थांबण्याचा इशारा केला. हे पाहून सिराज भडकला. रागात त्याने लाबुशेनच्या दिशेने चेंडू फेकून मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर लाबुशेनने चौकार मारत, सिराजला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक (४२) धावांची खेळी केली.

तर सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केएल राहुलने (३७) धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने (३१)धावांची खेळी केली.

आर अश्विनने (२२) आणि रिषभ पंतने (२१) धावांची खेळी केली. या डावात फलंदाजी करताना, विराट कोहली आणि रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरले. रोहित शर्मा अवघ्या (३) धावा करत माघारी परतला.

तर विराट कोहली (७) धावा करत तंबूत माघारी परतला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने सर्वाधिक ६ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठा धक्का

भारतीय संघाचा डाव १८० वर आटोपल्यानंतर, ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनीची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाला सावध सुरुवात करुन दिली. मात्र २४ धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का बसला. उस्मान ख्वाजा ३५ चेंडूत १३ धावांवर माघारी परतला. जसप्रीत बुमराहने टाकलेल्या चेंडूवर रोहित शर्माने शानदार झेल घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

SCROLL FOR NEXT