IND vs AUS 2nd Test Day google
Sports

IND vs AUS 2nd Test Day 1: ॲडलेड टेस्टचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, स्टार्कनंतर मॅकस्विनीची दमदार खेळी

IND vs AUS 2nd Test Day: ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केली. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 180 रन्सवर ऑलआऊट झाली.

Bharat Jadhav

ऑस्ट्रेलियाच्या संघाने अॅडलेट कसोटीचा पहिला दिवस आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाला १८० धावांवर बाद केल्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिवसाअखेर ८६ धावा केल्या. या धावा करताना ऑस्ट्रेलियाला एक विकेटदेखील गमवावी लागलीय. भारतीय संघाने केलेल्या १८० धावांचे आव्हान पार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आता फक्त ९४ धावा करायच्या आहेत. ९४ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आघाडी घेता येणार आहे. तर कसोटीत आपले वर्चस्व ठेवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना विकेटची प्रतिक्षा आहे.

भारतीय संघाची फलंदाजी झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने शानदार खेळ ८६ धावा केल्या तर एक विकेट गमावावी लागली. दरम्यान मॅकस्विनी आणि लॅबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. सामन्याच्या सुरुवातील कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र भारतीय फलंदाज यावेळी अपयशी ठरले. भारताची फलंदाजी पू्र्णपणे ढेपाळली. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक (४२) धावांची खेळी केली. सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केएल राहुलने (३७) धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने (३१)धावांची खेळी केली. त्यानंतर आर अश्विनने (२२) आणि रिषभ पंतने (२१) धावांची खेळी केली.

या डावात विराट कोहली आणि रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरले. रोहित शर्मा अवघ्या (३) धावा करत माघारी परतला. तर विराट कोहली फक्त (७) धावा करत माघारी परतला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने सर्वाधिक ६ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

SCROLL FOR NEXT