Ind vs Aus 2nd ODI News Updates ICC Twitter
Sports

IND vs AUS 2nd ODI : मिशेल स्टार्कची धारदार गोलंदाजी, दुसऱ्या वनडेत भारताची दाणादाण; 50 धावांत अर्धा संघ तंबूत

Ind vs Aus ODI series : भारतीय संघाकडे हा सामना जिंकून मालिका काबीज करण्याची सुवर्णसंधी आहे. परंतु या सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली.

Chandrakant Jagtap

India vs Australia Visakhapatnam Match : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. मिशेल स्टार्कच्या धारदार गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्कारली आहे. अवघ्या 50 धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतला. भारताने 91 धावांच्या स्कोअरवर आपल्या 7 विकेट गमावल्या आहेत.

पहिला सामना पाच गडी राखून जिंकल्यानंतर भारतीय संघाकडे हा सामना जिंकून मालिका काबीज करण्याची सुवर्णसंधी आहे. परंतु या सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. त्यानंतर भारतीय फलंदाजांना मिचेल स्टार्कपासून सावध राहणे आवश्यक होते.

परंतु स्टार्कने सुरुवातीच्या चार महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करून भारताच्या फलंदाजीला ब्रेक लावला. स्टार्कने केएल राहुल, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि सूर्याला बाद करून भारताचा स्कोअरबोर्ड थांबवला. त्यानंतर हार्दिकही बाद झाला, त्यामुळे भारताने 50 धावांत पाच विकेट गमावल्या.

50 धावांत अर्धा संघ तंबूत

दुसऱ्या वनडेत भारतीय संघाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. 50 धावांच्या आत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना एकही धाव करता आली नाही, तर रोहित शर्मा 13, केएल राहुल 9 आणि हार्दिक पंड्या 1 धावा करून बाद झाला. त्यानतंर विराट कोहली आणि रवींद्र जडेजाही माघारी परतले. त्यानंतर 104 धावांवर भारताने 9वी विकेट गमावली.

दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाः ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

lalbaugcha raja : ...अन् अंबानींचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांनी तराफा पाण्यात ढकलला; लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज, VIDEO

Daily Horoscope: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; वाचा तुमचे राशीभविष्य

Pregnancy: गरोदर महिलांनी चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नये, कारण...

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब का झाला?

Maharashtra Live News Update: पुराच्या पाण्यात चारचाकी वाहन वाहून गेलं

SCROLL FOR NEXT