ruturaj gaikwad run out twitter
Sports

IND vs AUS,1st T20I: ऋतुराज डायमंड डकवर आऊट होताच स्टोइनिसची मग्रुरी दिसली;कॅप्टन सूर्याने अशी जिरवली,Video

Marcus Stoinis Laughing On Ruturaj Gaikwad: भारतीय संघाची फलंदाजी सुरु होताच सलामी जोडीने असं काही केलं जे पाहून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हसू लागले.

Ankush Dhavre

India vs Australia, 1st T20I:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना इंग्लिसने तुफानी शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३ गडी बाद २०८ धावा केल्या.

इंग्लिसने ५० चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ११० धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने ८० आणि इशान किशनने ५८ धावांची खेळी केली. दरम्यान भारतीय संघाची फलंदाजी सुरु होताच सलामी जोडीने असं काही केलं जे पाहून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हसू लागले.

ऋतुराज डायमंड डकवर रनआऊट..

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची जोडी मैदानावर आली होती. तर मार्कस स्टोइनिस गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

या षटकातील सुरुवातीच्या ४ चेंडूंवर १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १० धावा केल्या होत्या. या षटकातील पाचव्या चेंडूवर यशस्वीने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट मारला. दोघेही फलंदाज धाव घेण्यासाठी धावले.

एक धाव पूर्ण केल्यानंतर यशस्वी दुसरी धाव घेण्यासाठी धावला. त्याला पाहून ऋतुराज गायकवाडही धावू लागला. मात्र पुढे जाताच तो थांबला आणि ऋतुराजला मागे जाण्याचा इशारा केला. मात्र वेळ निघून गेली होती.

नॅथन एलिसने चेंडू यष्टीरक्षक मॅथ्यू वेडकडे फेकला. हा चेंडू पकडत असताना वेड गोत्यात आला होता.शेवटी त्याने चेंडू पकडला आणि ऋतुराजला बाद केलं. यासह ऋतुराज गायकवाड एकही चेंडू न खेळता शू्न्यावर बाद होऊन माघारी परतला. ऋतुराज ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून मार्कस स्टोइनिसला हसू आवरलं नाही. (Latest sports updates)

भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय..

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २०९ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला. हा आतापर्यंतचा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग ठरला आहे. या विजयासह भारतीय संघ टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारा संघ ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT