rohit sharma saam tv news
क्रीडा

Rohit Sharma Record: हिटमॅन रचणार इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये धोनीला मागे सोडत बनणार नंबर १

IND vs AFG 3rd T20I: तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Record News:

अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तर मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या मैदानावर भारतीय कर्णधार रोहित शर्माला माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

रोहित शर्मा टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर टी -२० क्रिकेटपासून दूर होता. त्याने तब्बल १४ महिन्यांनंतर टी -२० क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. संघात कमबॅक होताच तो संघाचं नेतृत्व करतोय. आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेली टी -२० मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची आहे. या महत्वाच्या मालिकेत भारतीय संघाने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. (Latest sports updates)

धोनीचा रेकॉर्ड मोडला जाणार?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यान सुरू असलेल्या टी -२० मालिकेत रोहितची बॅट तळपलेली नाही. कारण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. मात्र नेतृत्वाच्या बाबतीत तो सुपरहीट ठरला आहे.

भारतीय संघाकडून सर्वाधिक टी -२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा रेकॉर्ड हा एमएस धोनीच्या नावे आहे. मालिकेतील दुसरा सामना जिंकताच त्याने धोनीच्या या रेकॉर्डची बरोबरी केली. मात्र तिसरा सामना जिंकून त्याला सर्वाधिक टी -२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनण्याची संधी असणार आहे. सध्या रोहित आणि धोनीच्या नावे प्रत्येकी ४१-४१ सामने जिंकण्याची नोंद आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत १५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५३ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तर एमएस धोनीने ९८ पैकी ७२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान दोन्ही कर्णधारांनी ४१-४१ सामने जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

SCROLL FOR NEXT