virat kohli saam tv news
क्रीडा

Virat Kohli Record: इतिहास रचण्यापासून विराट अवघ्या ३५ धावा दूर! असा कारनामा करणारा ठरणारा पहिलाच भारतीय फलंदाज

Virat Kohli Record In T20 Cricket: भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमधील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे

Ankush Dhavre

India vs Afghanistan 1st T20I:

भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमधील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. गेल्या एक वर्षापासून संघाबाहेर असलेला विराट कोहली या सामन्यातून कमबॅक करताना दिसून येणार आहे. या सामन्यात त्याला इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

विराट कोहली ऑल फॉरमॅट प्लेअर आहे. वनडे, कसोटीसह टी-२० क्रिकेटमध्येही त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. दरम्यान पहिल्या टी-२० सामन्यात अवघ्या ३५ धावा करताच तो टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण करणार आहे. असा कारनामा करणारा तो पहिलाच भारतीय तर जगातील चौथा फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी असा कारनामा कुठल्याच भारतीय फलंदाजाला करता आलेला नाही. जर विराटने हा रेकॉर्ड केला तर त्याच्या नावाची इतिहासात नोंद होणार आहे.

विराटला इतिहास रचण्याची संधी..

विराट कोहलीच्या एकूण टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३७४ सामन्यांमध्ये ४१.४० च्या सरासरीने ११९६५ धावा केल्या आहेत. त्याला १२ हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या ३५ धावांची गरज आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ख्रिस गेल, शोएब मलिक आणि कायरन पोलार्डला करता आला आहे. (Latest sports updates)

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

१. ख्रिस गेल (वेस्टइंडीज) - ४६३ सामन्यांमध्ये १४५६२ धावा

२. शोएब मलिक (पाकिस्तान) - ५२५ सामन्यांमध्ये १२९९३ धावा

३. कायरन पोलार्ड (वेस्टइंडीज) - ६३७ सामन्यांमध्ये १२३९० धावा

४. विराट कोहली (भारत) - ३७४ सामन्यांमध्ये ११९६५ धावा

५. अॅलेक्स हेल्स (इंग्लंड) - ४२५ सामन्यांमध्ये ११७३६ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT