India vs afganistan 1st t20 match indian team won by 7 wickets against afg 
Sports

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा दारूण पराभव

IND vs AFG 1st T20: भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानला ७ गडी राखून पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

Bharat Jadhav

भारतीय संघाने अफगाणिस्तान टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केलीय. अरुण जेटली स्टेडियमवर भारताने ७ गडी राखून सहज विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने अवघ्या १३.४ षटकांत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आधी फलंदाजी करताना अफगाणिस्तानने १५७ धावांचे आव्हान दिलं होतं. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा निर्णय योग्य ठरला आणि अफगाणिस्तान मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.

अभिषेक शर्माचे २२ चेंडूंत अर्धशतक अभिषेक शर्माने भारतीय संघासाठी अवघ्या १० चेंडूंत ८२ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ षटकार मारले. अभिषेकने २२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. सलामीवीर संजू सॅमसन ८ चेंडूंत १० धावांवर बाद झाला. अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली.

अफगाणिस्तानने दिलेल्या १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसनला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ८ चेंडूत १० धावा केल्या. पण यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी डाव सावरला आणि या दोघांनीही शानदार फलंदाजी करून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमछाक केली. शानदार फटकेबाजी करत दोघांनी संघाची धावसंख्या वाढती ठेवली.

अभिषेकने ३२ चेंडूत ७२ धावांची शानदार खेळी केली. त्याने ७ चौकारांसह ७ षटकार ठोकले. तर इशान किशननेही ३३ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४२ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने ५ चेंडूत नाबाद ८ आणि तिलक वर्माने ४ चेंडूत नाबाद ३ धावा केल्या. अशा प्रकारे भारतीय संघाने १३.४ षटकांत ३ बाद १५७ धावा करत सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

अफगाणिस्तानला केवळ १५६ धावा करता आल्या

अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झादरान यांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. गुरबाज खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, तर झद्रानने ११ चेंडूत १११ धावा केल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला सादिकउल्लाह अटल, १३ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. तर गुलबदीन नैबने ६ चेंडूत २ धावा केल्या.

दरवेश रसओलीही ६ चेंडूत २ धावा करून बाद झाला. यानंतर अझमतुल्ला उमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी डाव सावरला. दोघांनी अफगाणिस्तानच्या विस्कटलेल्या फलंदाजीला आकार देत एक सन्मानजनक धावसंख्या उभारली. उमरझाईने शानदार अर्धशतक केलं . त्याने नाबाद राहत ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. नबीनेही २७ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे अफगाणिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावत १५६ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT