vaibhav sooryavanshi Under 19 World Cup Final Score saam tv
Sports

Ind U19 vs Eng U 19 Final : ८० बॉल, १७५ रन्स, १५ फोर, १५ सिक्स....वैभव सूर्यवंशीची फायनलमध्ये तोडफोड इनिंग, इतिहास रचला!

vaibhav suryavanshi historic 175 u19 world cup final : अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीनं ऐतिहासिक खेळी केली. अवघ्या ८० चेंडूंत विस्फोटक बॅटिंग करत १७५ धावा केल्या.

Nandkumar Joshi

तो खेळतो तेव्हा धावांचा पाऊस पडतो, तो खेळतो तेव्हा मैदानावर चौकार-षटकारांच्या धारा कोसळतात, तो खेळतो तेव्हा विरुद्ध संघाचा गोलंदाज पुरता हतबल होतो, तो खेळतो तेव्हा मैदानातील प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फिटतात....होय तोच वैभव सूर्यवंशी. आज असाच काहीसा अनुभव क्रिकेटच्या मैदानावर बघायला मिळाला. अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध त्यानं विस्फोटक हा शब्दही कमी पडेल अशी खेळी केलीय. अवघ्या ८० बॉलमध्ये १७५ धावा कुटल्या. याचबरोबर त्यानं वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

फायनलच्या सामन्यात टीम इंडियाचे धुरंधर सलामीवीर मैदानात उतरले. फायनलमध्ये अपेक्षित सुरूवात मिळेल, असं वाटलं होतं. पण सुरुवात अत्यंत खराब झाली. एरॉन जॉर्ज अवघ्या ९ धावा करून तंबूत परतला. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी डावाला आकार दिला. हळूहळू मैदानात स्थिरस्थावर झाले. त्यानंतर धुलाई करण्यास सुरुवात केली. सूर्यवंशीनं एका बाजूनं किल्ला लढवत अवघ्या ३२ चेंडूंत अर्धशतक ठोकलं. तर ५५ चेंडूंपर्यंत तो शतकाच्या जवळ जाऊन पोहोचला. तर ८० चेंडूंमध्ये १७५ धावांची तोडफोड खेळी केली. यात त्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडला. १५ चौकार आणि १५ उत्तुंग षटकारांचा समावेश या खेळीत होता.

अंडर १९ मध्ये शतक ठोकणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी उन्मुक्त चंद आणि मनजोत कालरा यांनी कमाल केली होती. पण वैभव सूर्यवंशीनं वेगवान शतक झळकावलं आहे. या शतकी खेळीसह त्यानं अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

वैभव सूर्यवंशीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड

  • वैभव सूर्यवंशी अंडर १९ वर्ल्डकप फायनलमध्ये शतक झळकावणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरलाय.

  • अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर झालाय.

  • वैभव सूर्यवंशीने अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत.

  • भारताचा स्फोटक फलंदाज अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत एकाच सीझनमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू ठरला आहे.

  • वैभव सूर्यवंशी यानं अंडर १९ वनडे वर्ल्डकप क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांचे पक्षामधून निलंबन?

Rose Day Outfits Ideas: रोझ डे ला अनन्या पांडे अन् दीपिका पादुकोनसारखा करा स्टायलिश लूक

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू

अजित पवारांच्या निधानानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

KDMC News : अरेरे! कल्याण डोंबिवली महापौर बंगल्याची वाईट अवस्था; केडीएमसीच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या करोडो रुपयांची उधळपट्टी

SCROLL FOR NEXT