ind vs aus twitter
Sports

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

IND vs AUS 1st ODI Rohit Sharma Virat Kohli fail : सात महिन्यांनंतर मैदानावर परतलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाले. पर्थ वनडे सामन्यात दोघांनाही ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजांनी तंबूत धाडले. शुभमन गिलही फारकाळ टिकू शकला नाही, भारताची अवस्था ३ बाद २५ अशी झाली.

Namdeo Kumbhar

IND vs AUS 1st ODI Latest Marathi News : सात महिन्यांनंतर मैदानावर परतणारे विराट कोहली अन् रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतले. रोहित-विराटची फलंदाजी पाहण्यासाठी पर्थचे मैदान हाऊसफुल झाले होते. पण सर्वांचीच निराशा झाली. रोहित शर्मा फक्त ८ धावा काढून माघारी परतला. तर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाचे भेदक गोलंदाजी हेजलवूड अन् स्टार्क यांनी विराट-रोहितला स्वस्तात तंबूत धाडले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून तीन सामन्याच्या वनडे मालिकेला सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्टार्क-हेजलवूड जोडीने बरोबर असल्याचे दाखवले. हेजलवूडने रोहित शर्माला आठ धावांवर तंबूत धाडले तर स्टार्कने विराट कोहलीला एकही धाव काढू दिली नाही. विराट अन् रोहित या अनुभवी फलंदाजाला स्वस्तात तंबूत पाठवत भारतावर दबाव निर्माण केलाय.

विराट कोहली अन् रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर निवृत्तीच्या चर्चेला पुन्हा जोर धरला. दोघांची ही शेवटची मालिका असेल, यापुढे त्यांना स्थान मिळणार नाही, अशा काहींच्या प्रतिक्रिया एक्सवर येत आहेत. त्याशिवाय काहींच्या मते, मोठ्या ब्रेकनंतर दोघांनी कमबॅक केलेय. त्यांना लयीत येण्यासाठी वेळ लागेल. इतक्यात कोणत्या निर्णायावर जाऊ नये. सोशल मीडियावर विराट-रोहित यांच्याबद्दल समिश्र प्रतिक्रिया येत आहे.

विराट-रोहितसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील ही वनडे मालिका अतिशय महत्त्वाची आहे. २०२७ च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिकेत धावा काढणं गरजेचं होतं. पण दोघेही स्वस्त तंबूत परतले. वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरोधात पहिल्यांदाच शून्यावर बाद झालाय, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. रोहित-विराटनंतर गिलही फारकाळ मैदानावर थांबू शकला नाही. शुभमन गिल १० धावा काढून बाद झाला. भारतीय संघ ८ षटकानंतर ३ बाद २५ अशा खराब स्थितीमध्ये आहे. आता श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या जोडीवर मोठी जबाबदारी असेल.

भारताची प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेवन

ट्रेविस हेड, मिच मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कोनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नाथन एलिस, मॅथ्यू कुहनेमॅन आणि जोश हेझलवुड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT