Nashik Karmabhoomi Express accident details : दिवाळीसाठी एक्सप्रेसने घरी जाणाऱ्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेतून तीन जण खाली पडले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. कर्मभूमी एक्सप्रेसमधील दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वेमध्ये एकच खळबळ उडाली. (Two passengers dead after falling from train near Nashik)
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून रकसोल (बिहार) कडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भागात तिघे युवक खाली पडल्याची भीषण दुर्घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमी युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवार रात्री नाशिकरोड रेल्वे स्थानकावर न थांबता कर्मभूमी एक्सप्रेस गाडी पुढे गेली. त्यानंतर ओढा रेल्वे स्थानकावरील स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिकरोड रेल्वे विभागाशी संपर्क साधून कळवले की, गाडी सुटल्यानंतर काही वेळात जेल रोड हनुमान मंदिरजवळील ढिकले नगर परिसरात तिघे युवक रेल्वेखाली पडल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या रुळावरील किलोमीटर 190/1 ते 190/3 दरम्यान 30 ते 35 वयोगटातील दोन युवक मृतावस्थेत आढळले. तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. गंभीर असलेल्या युवकास तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गाडीतून पडून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार निवडणुकीसाठी मतदानासाठी जात होते, याबाबतही तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.