वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ सराव सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. या मालिकेत पाकिस्तानचा संघ नव्या कर्णधारासह मैदानावर उतरला आहे.
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पाकिस्तानला भारतीय संघाकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला आम्ही टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत घेऊ असा इशारा पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार अहमदने दिला आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये झालेल्या दारुण पराभवाचा बदला पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत घेईल, असा विश्वास इफ्तिखार अहमदने (Iftikhar Ahmed) व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की,'वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आमचा संघ पराभूत झाला असला तरी टी-२० क्रिकेटमध्ये आमचा संघ भारतीय संघापेक्षा मजबूत आहे. आम्ही नक्कीच पराभवाचा बदला घेऊ आणि भारतीय संघावर विजय मिळवू. आमच्या संघात बाबर आझमसारखा वर्ल्डक्लास फलंदाज आहे. तर १५० च्या गतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. आक्रमक क्रिकेट खेळून भारतीय संघाविरुद्ध विजय मिळवला जाऊ शकतो. भारताविरुद्ध मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल.' (Latest sports updates)
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत २ सामने जिंकल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केला. पाकिस्तानचा डाव या सामन्यात २०० च्या आत संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने ८७ धावा करत भारतीय संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे पाकिस्तानचा संघ:
शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, नोमान अली, सइम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सौद शकील आणि शाहीन शाह आफ्रिदी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.