ICC Champions Trophy: आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे भारतीय संघाला ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळायची आहे. मात्र पाकिस्तानला हे नकोय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या मते, भारताने ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात यावं. मात्र जर भारतीय संघ पाकिस्तानात गेलाच नाही, तर पाकिस्तान समोर काय पर्याय असतील? जाणून घ्या.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डला अजूनही वाटतंय की, भारतीय संघ ही स्पर्धा पाकिस्तानात येणार. जर नाहीच आला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही आपली मतं मांडली आहेत.
पाकिस्तानी दिग्गजांच्या मते, पाकिस्तानने आशिया कप स्पर्धेला बॉयकॉट करावं. आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धा भारतात होणार आहे. पाकिस्तानने ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतात जाऊच नये, असं पाकिस्तानी दिग्गजांचं म्हणणं आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघ जर पाकिस्तानात खेळण्यासाठी गेला नाहीतर पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद सोडू शकते. असे झाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते.
कारण फ्रेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात SA लीग स्पर्धा समाप्त होणार आहेत. त्यामुळे ही मैदानं खेळण्यासाठी उपलब्ध असतील. यासह बऱ्याच वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत आयसीसीची कुठलीही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिका बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.
माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असलं तरीदेखील भारताला ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळायची आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाऊ शकतात. मात्र पाकिस्तानला हे नकोय.
यापूर्वी आशिया कप २०२३ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यावेळी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवले गेले होते. भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.