gt vs mi  saam tv
Sports

GT vs MI, IPL 2023 Qualifier 2: धोनीविरुद्ध केलेली चूक रोहितसमोर करणं हार्दिकला पडू शकतं महागात

GT vs MI, IPL 2023: चेन्नई विरूद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने एक मोठी चूक केली होती.

Ankush Dhavre

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारा पहिला संघ ठरला आहे. येत्या २८ मे रोजी चेन्नईचा संघ जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र चेन्नईला टक्कर देणारा संघ कोणता असेल याचा निकाल आज लागणार आहे.

आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. गुजरातला अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे..

गुजरात टायटन्स संघाने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी केली होती. १४ पैकी १० सामने जिंकून २० गुणांसह हा संघ अव्वल स्थानी होता. क्वालिफायर १ च्या सामन्यात गुजरातचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत रंगला होता.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने एक मोठी चूक केली होती. हीच चूक जर आज होणाऱ्या सामन्यात केली तर,मुंबईचा संघ अंतिम फेरीत जाऊ शकतो.

बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल..

क्वालिफायर सारख्या महत्वाच्या सामन्यात हार्दिक पंड्याने बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला होता. गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ७ गडी बाद १७२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातचा डाव १५७ धावांवर संपुष्टात आला होता.

एका बाजूने शुभमन गिल डाव सावरत होता. त्यावेळी त्याला दुसऱ्या बाजूने सपोर्टची गरज होती. मात्र ऐनवेळी हार्दिक पंड्याने बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला. (Latest sports updates)

विजय शंकरला थांबवलं..

तिसऱ्या क्रमांकावर विजय शंकर फलंदाजी करण्यासाठी येत होता. तो या संघातील दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने ३०१ धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात त्याने अर्धशतक देखील झळकावले होते.

मात्र त्याच्याऐवजी स्वतः हार्दिक पंड्या फलंदाजीला आला. बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केल्यामुळे विजय शंकरला हवा तसा रिदम मिळाला नाही. त्यामुळे मॅचविनर विजय शंकर स्वस्तात माघारी परतला. हीच चूक जर गुजरातने मुंबई विरुध्द केली,तर नक्कीच मुंबई आणि चेन्नईचा अंतिम सामना पहायला मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक

Vijaykumar Gavit: डॉ. विजयकुमार गावित सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री; शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप|VIDEO

Salman Khan Shera : सलमान खानच्या बॉडीगार्डवर दु:खाचा डोंगर, शेराच्या वडिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू

Government Scheme: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सरकारची 'ही' जबरदस्त योजना, खात्यात जमा होणार ३६००० रुपये

SCROLL FOR NEXT