ICC Ranking : टीम इंडिया अवघ्या काही तासात ICC कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. आज म्हणजेच 15 फेब्रुवारी टीम इंडिया कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती. पण संध्याकाळपर्यंत ती नंबर-2 वर आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ आता पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. गेल्या महिन्यातही आयसीसीच्या वेबसाईटने भारताला कसोटी क्रमवारीत नंबर-1 घोषित केले होते. त्यावेळीही काही तासांनंतर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आली होती.
आयसीसीच्या वेबसाइटवर आज रँकिंग अपडेट करण्यात आली तेव्हा टीम इंडियाला 115 रेटिंग पॉइंट दाखवण्यात आले, तर ऑस्ट्रेलिया 111 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र सायंकाळपर्यंत ऑस्ट्रेलिया 126 गुणांसह कसोटी क्रमवारीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत 115 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा कसोटी क्रमवारीत नंबर-1 होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
टीम इंडिया याआधी तीन वेळा नंबर-1 बनली आहे. 1973 मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत भारत नंबर-1 बनला. त्यानंतर तब्बल 26 वर्षांनी 2009 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटीत अव्वल स्थान मिळवले. यानंतर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2016 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आणि चार वर्षे नंबर-1 राहिली. (Latest Sports Updates)
टीम इंडिया सध्या ICC च्या ODI आणि T20 क्रमवारीत नंबर-1 वर आहे. मात्र काही तासांपर्यंत भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 असल्याने चाहते आनंदी होते आणि ICC च्या चुकीमुळे चाहतेही संतापले आहेत.
जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली कसोटी जिंकली तर पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. त्यावेळी भारताचे 121 गुण असतील तर ऑस्ट्रेलियाचे 120 गुण असतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत कसोटी सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 114 आणि 267 रेटिंग पॉइंट्ससह नंबर-1 वर आहे. तर ऑस्ट्रेलिया 112 गुणांसह वनडे क्रमवारीत नंबर-2 संघ आहे. मागील वर्षी T20 विश्वचषक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.