team india saam tv
Sports

IND vs PAK Match Date: डायरीत नोट करून घ्या! 'या' दिवशी भारत- पाकिस्तान येणार आमने सामने; पाहा वेळापत्रक

World Cup 2023 India Schedule: जाणून घ्या केव्हा आणि कुठे रंगणार आहे, भारत - पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना.

Ankush Dhavre

ICC ODI WC 2023 Full Schedule: आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. नुकताच आयसीसी आणि बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा सुरु व्हायला आता अवघे १०० दिवस शिल्लक राहिले आहेत. वेळापत्रक जाहीर होताच, भारत - पाकिस्तान सामन्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. चला तर जाणून घ्या केव्हा आणि कुठे रंगणार आहे, भारत - पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना.

भारत -पाकिस्तान सामन्याची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हा सामना महायुद्धापेक्षा कमी नसतो. कारण हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने सामने येत असतात. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत देखील या दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

हा हाय व्होल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी भारत- पाकिस्तान या दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसह जगभरातील क्रिकेट चाहते देखील हजेरी लावु शकतात.

या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ९ सामने खेळणार आहे.

भारतीय संघाची गेल्या २ विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर, भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. (Latest sports updates)

असे आहेत भारतीय संघाचे सामने..

८ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

११ ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

१५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

१९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

२२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला

२९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ

२ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई

५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

११ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू (ICC ODI WC 2023 Time Table)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रिलसाठी तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून पेटवली; सेकंदातच स्फोट झाला, संपूर्ण जबडा फाटला

Gurukul Monitor POCSO Case: भयंकर! विद्यार्थ्याचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल; गुरुकुलात धक्कादायक प्रकार|VIDEO

Vande Bharat Train: रेल्वेचा कोच की हॉटेलचा रुम! वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Pune News : एवढी मुजोरी! बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीत लाडक्या बहिणींसह उत्साहात साजरी केली भाऊबीज

SCROLL FOR NEXT