team india twitter
Sports

Team India: भारताच्या नवदुर्गा! टीम इंडियाच्या रणरागिणी उंचावणार T-20 WC ची ट्रॉफी

Womens T20 World Cup 2024: आजपासून महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला सुरुवात होणारआहे.

Ankush Dhavre

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरद्ध होणार आहे.

भारतीय पुरुष संघाने यावर्षी टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान आता महिलाही टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दरम्यान महिला संघातील कोणत्या ९ वंडर वुमन सामना फिरवू शकतात? जाणून घ्या.

हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला संघाची कर्णधार आहे. आगामी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत तिच्याकडून चांगली कामिगिरीची अपेक्षा असणार आहे. तिच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत एकूण १७३ सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने ३४२६ धावा केल्या आहेत.

स्रिती मंधाना

स्रिती मंधाना देखील भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. भारतीय संघाला जर टी-२० वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत टिकून फलंदाजी करावी लागणार आहे. तिच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने १४१ सामन्यांमध्ये २८५१ धावा केल्या आहेत.

शेफाली वर्मा

शेफाली वर्मा हा भारतीय संघातील सर्वा आक्रमक फलंदाज आहे. भारतीय संघाला तिच्याकडून विस्फोटक सुरुवातीची अपेक्षा असणार आहे. तिने आतापर्यंत एकूण ८१ टी-२० सामने खेळले असून १४९२ धावा केल्या आहेत.

दिप्ती शर्मा

दिप्ती शर्माने ११७ सामन्यांमध्ये १०२० धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना तिने १३१ गडी बाद केले आहेत.

जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज ही मध्यक्रमातील मजबूत फलंदाज आहे. ती मधल्या षटकांमध्ये मोठे फटके खेळून संघाला मजबूत स्थितीत पोहचवू शकते. तिने आतापर्यंत १०० सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने २०७४ धावा केल्या आहेत.

रुचा घोष

रुचा घोषच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तिने ५५ सामन्यांमध्ये ८६० धावा केल्या आहेत.

यस्तीका भाटीया

यस्तीका भाटीयाच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत १९ सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने २१४ धावा केल्या आहेत.

पूजा वस्त्राकर

पूजा वस्त्राकरच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने ६० टी-२० सामन्यांमध्ये ३१५ धावा केल्या आहेत.

अरुंधती रेड्डी

अरुंधती रेड्डीच्या टी-२० क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर या खेळाडूने २९ सामने खेळले आहेत. यादरम्यान या खेळाडूला ७२८ धावा करता आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT