Alyssa Healy Saam Tv
क्रीडा

World Cup: अलायसा हिलीनं केल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा

अलायसा हिली ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची पत्नी आहे.

साम न्यूज नेटवर्क

क्राइस्टचर्च : ऑस्ट्रेलियाची (australia) सलामीवीर अलायसा हिलीने (Alyssa Healy) महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत (icc women world cup 2022) अंतिम फेरीत इंग्लंड (England) विरुद्ध शानदार खेळी करीत १७० धावा केल्या. हिलीने महिला विश्वकरंडक स्पर्धेत मोठा विक्रम प्रस्थापित केला असून तिने केवळ न्यूझीलंडच्या डेबी हॉकलीचा २५ वर्षापुर्वीचा विक्रमच नव्हे तर स्पर्धेत ५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू देखील ठरली आहे. (alyssa healy latest marathi news)

अलायसा हिली ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची (Mitchell Starc) पत्नी आहे. मिशेलने तिच्या कामगिरीचे प्रेक्षा गॅलरीत उभे राहून टाळ्यांच्या गजरात काैतुक केले.

यापुर्वी हॉकलीने १९९७ ला भारतात (india) झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट (cricket) स्पर्धेत ४५६ धावा केल्या होत्या. हॉकली आता विक्रमात तिस-या क्रमांकावर गेली आहे. हिली आणि तिची सलामीची जोडीदार रॅचेल हेन्स यांनी अनुक्रमे ५०९ आणि ४९७ धावा करत अव्वल दोन स्थान मिळवले.

हेन्सच्या ४९७ धावांच्या पुढे जात हीलीने ४५ व्या षटकात इंग्लंडची वेगवान गोलंदाज केट क्रॉसला लागोपाठ दोन चौकार ठोकून नवा विक्रम स्थापित केला. तिने १३८ चेंडूंत २६ चौकारांसह १७० धावांची जबरदस्त खेळी खेळली. ४६ व्या षटकात अन्या श्रबसोलेकडून ती बाद झाली.

वर्ल्डकप (महिला पुरूष) फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा अलायसा हिलीचा विक्रम

१७० धावा - अलायसा हिली (सन २०२२)

१४९ अॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) (२००७)

१४०* रिकी पाँटिंग (Ricky Ponting) (२००३)

१३८* - व्हिव्ह रिचर्ड्स (Viv Richards) (१९७९)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नाशिक मतमोजणी केंद्रावर आरोग्य सेविका चिमुकल्या बाळाला घेऊन दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT