ICC U19 Womens T20 World Cup Asia saam tv
Sports

असं कुठं असतंय व्हय! ८ धावांवर अख्खा संघ गारद, दुसऱ्या ओव्हरमध्येच खेळ खल्लास!

नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सपशेल चुकीचा ठरला.

Nandkumar Joshi

मुंबई: क्रिकेट (cricket) हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं उगाच म्हणत नाहीत. क्रिकेटमध्ये सहा चेंडूंवर सहा उत्तुंग षटकार तडकावण्याची किमयाही केली जाते, तर एका ओव्हरमधील सहा चेंडूंवर सहा विकेट्सही घेण्याची संधी असते. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच काहीशी गत नेपाळ (Nepal Team) संघाची झाली. यूएईच्या संघानं अवघ्या ८ धावांवर अख्खा नेपाळचा क्रिकेट संघ गारद केला. इतकेच नाही तर, यूएईने (UAE) हे लक्ष्य अवघ्या सात चेंडूंत पार केले. क्रिकेट विश्वातला हा एक नवा विक्रमच म्हणता येईल.

टी-२० महिला अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या क्वालीफायर सामन्यात यूएई आणि नेपाळचा संघ आमनेसामने होता. यूएईची गोलंदाज महिका गौर हिने अवघ्या २ धावा देत पाच विकेट घेतल्या. तिच्या गोलंदाजीच्या तिखट माऱ्यासमोर नेपाळचा संघ ढेपाळला. नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा हा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. सहा फलंदाज तर शून्यावर बाद झाले. ५० षटकांच्या सामन्यात संपूर्ण संघ हा ८.१ षटकांत गुंडाळला.

विशेष म्हणजे नेपाळच्या सहा फलंदाजांनी शून्य धावा केल्या. तर स्नेहा महारा हिने सर्वाधिक तीन धावा केल्या. त्यासाठी ती १० चेंडू खेळली. नेपाळचा संघ ८ धावांवर गारद झाल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यूएईच्या सलामीवीरांनी अवघ्या ७ चेंडूंत विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT