Virat Kohli And Rishabh Pant Saam Tv
Sports

ICC Test Rankings: कोहलीला 'विराट' झटका, ६ वर्षांत पहिल्यांदाज असं घडलं; रिषभ पंतची मोठी झेप

ICC Test Rankings Virat Kohli | विराट कोहलीला तगडा झटका

Nandkumar Joshi

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळानं (ICC) बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी प्रसिद्ध केली. त्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (virat Kohli) मोठा फटका बसला आहे. कसोटी क्रमवारीतील अव्वल दहा फलंदाजांच्या यादीतून तो बाहेर फेकला गेला आहे. सहा वर्षांत पहिल्यांदाच त्याला टॉप टेनमधील स्थान गमवावं लागलं आहे. तर विकेटकीपर (Rishabh Pant) रिषभ पंतने कसोटी क्रमवारीत टॉप ५ मध्ये स्थान पटकावलं आहे.

इंग्लंड संघाला भारत विरुद्धच्या एजबेस्टन कसोटीत विजय मिळवून देणारा आणि गेल्या तीन कसोटी सामन्यांत चार शतके ठोकणाऱ्या जॉनी बेयरस्टोने मोठी झेप घेतली आहे. त्याने कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या टॉप टेन यादीत स्थान मिळवलं आहे. बेयरस्टोने ११ स्थानांनी झेप घेत दहावं स्थान पटकावलं आहे.

कोहली १३ व्या स्थानी, पंत पाचव्या क्रमांकावर

विराट कोहली एजबेस्टन कसोटीत काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने या कसोटीत एकूण ३१ धावा केल्या. त्यामुळे त्याला कसोटी क्रमवारीत मोठा फटका बसला. टॉप १० मधून बाहेर पडला असून, आता तो १३ व्या स्थानी आहे. तर एजबेस्टन कसोटीत पहिल्या डावात १४७ धावा आणि दुसऱ्या डावात ५७ धावांची खेळी करणारा रिषभ पंत पाचव्या स्थानी विराजमान झाला आहे.

रिषभ पंतने मागील सहा कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. पंतच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट अव्वल स्थानी आहे. जो रूटने एजबेस्टन कसोटीत दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता.

टॉप १० फलंदाजांच्या यादीत दोन भारतीय

कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या यादीत टॉप १० मध्ये दोन भारतीयांनी स्थान पटकावलं आहे. विराट कोहली अव्वल १० फलंदाजांच्या यादीतून बाहेर झाला आहे. मात्र, पंतने एन्ट्री केली आहे. त्याच्यासह रोहित शर्मा हा टॉप १० यादीत आहे. मात्र, त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. तो सध्या ९व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT