ICC Test Championship Points Table Saam TV
Sports

WTC Points Table : पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर; टीम इंडिया कुठल्या स्थानी?

या विजयाचा आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला मोठा फायदा झाला आहे.

Satish Daud

ICC Test Championship Points Table : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेची धडाकेबाज सुरूवात झाली. नागपुरात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाने झटपट ४०० धावा करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. (Latest Marathi News)

त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंसमोर नागी टाकली. ऑस्ट्रेलियाला आपल्या दुसऱ्या डावात फक्त ९२ धावाच करता आल्या. परिणामी टीम इंडियाने हा सामना १ डाव आणि तब्बल १३२ धावांनी आपल्या खिशात घातला. या विजयाचा आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला मोठा फायदा झाला आहे. (Latest Sports Update)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये झालेला ऑस्ट्रेलियाचा हा केवळ दुसरा पराभव आहे. त्यांनी १६ सामन्यांमध्ये १० विजय मिळवले असून ४ सामने अनिर्णयित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी ७०.८३ इतकी असून अजूनही ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला (India vs Australia)  पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला गुणतालिकेत फायदा झाला आहे. या विजयाने टीम इंडियाने आपलं दुसरं स्थान आणखीच मजबूत केलं आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १५ सामने खेळले असून यातील ९ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या भारताच्या विजयाची टक्केवारी ६१.६६ इतकी आहे.

मागच्या टेस्ट चँम्पियनशिप स्पर्धेच्या तुलनेत यावेळी आयसीसीने गुणांच्या पद्धतीत थोडा बदल केला आहे. यावेळी सामना जिंकण्याऱ्या संघाला १२ गुण दिले जात आहे. सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ६-६ गुण मिळतात. ड्रॉसाठी ४ गुण तर पराभवासाठी कोणतेही गुण नाहीत. दुसरीकडे, गुणांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, जिंकल्यावर १०० टक्के, टाय झाल्यास ५० टक्के, ड्रॉ झाल्यास ३३.३३ टक्के आणि हरल्यावर कोणतेही गुण दिले जात नाहीत.

आयसीसी गुणतालिका आणि गणित

गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया ७०.८३ गुणांसह अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने जर भारताविरुद्धची मालिका गमावली. तरी त्यांना कोणताही फरक पडणार नाही. मालिका पराभूत झाल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या स्थानी येऊ शकते. भारत ६१.६७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ३-१ नं जिंकायची आहे. तिसऱ्या स्थानी ५३.३३ गुणांसह श्रीलंका आहे. तर चौथ्या स्थानी ४८.७२ गुणांसह दक्षिण आफ्रिका आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमवल्यास श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर गणित अवलंबून असणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, नेटकऱ्यांनी जोरदार फटकारले; VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT