Suryakumar Yadav ICC T20I Rankings saam tv
Sports

ICC T20I Rankings: तो अजूनही 'SKY'च! खराब फॉर्मात असूनही सूर्यकुमार टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी कायम

Suryakumar Yadav ICC Rankings: सूर्यकुमार यादवच्या शेवटच्या 7 डावांवर नजर टाकली तर तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

Chandrakant Jagtap

Suryakumar Yadav ICC T20I Rankings: खराब फॉर्म असूनही सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना भारतीय संघातील अव्वल फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव सातत्याने निराशाजनक कामगिरी करत आहे.

सूर्यकुमार यादवच्या शेवटच्या 7 डावांवर नजर टाकली तर तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. याआधी तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खाते न उघडता तीन वेळा गोल्डन डक ठरला होता. दरम्यान आयसीसी टी -20 क्रमवारीत त्याच्या या खराब फॉर्मचा काहीही परिणाम झालेला नाही.

बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी पुरष टी-20 (ICC Men's T20 Rankings) फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादवने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर पाकिस्तानी जोडी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना भारतीय फलंदाजाच्या जवळ येण्याची संधी मिळाली आहे.

सूर्यकुमारने टी-20 क्रमवारीत 906 गुणांसह भक्कम आघाडी कायम राखली आहे. त्यापाठोपाठ मोहम्मद रिजवान 811 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे तर बाबरने एका स्थानाने प्रगती करत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात 755 गुण आहेत.

या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम चौथ्या आणि न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे पाचव्या स्थानावर आहे. बाबर आणि रिझवान पाकिस्तानने नुकत्याच बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर होते.

श्रीलंकेविरुद्धच्या न्यूझीलंडच्या मालिकेत कॉनवे संघात नव्हता, त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम क्रमवारीत एक स्थान वर गेला. शनिवारपासून पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. तेव्हा पाकिस्तानी जोडीला सूर्यकुमारच्या जवळ जाण्याची संधी मिळेल. (Sports News)

सूर्यकुमार यादवला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून तो तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत फ्लॉप होत आहे. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील एकमेव कसोटी डावात 8 धावा केल्या होत्या. यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे मालिकेत संधी मिळाली. परतु तो तिन्ही वेळा गोल्डन डकवर म्हणजेच शून्यावर बाद झाला.

एकदिवसीय मालिकेनंतर त्याने आयपीएल खेळायला सुरुवात केली तेव्हा तो वाईट फॉर्मधून बाहेर पडेल असे वाटत होते. परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्याने केवळ 15 धावा केल्या होत्या आणि त्याच्या त्याच्या पुढच्याच सामन्यात तो पुन्हा 1 धावेवर बाद झाला. त्यानतंर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर मुंबईतील वानखेडेवर देखील त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

यानंतर मंगळवारी त्याला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपला फॉर्म सिद्ध करण्याची चांगली संधी होती. येथे शेवटच्या 4.1 षटकात मुंबईला विजयासाठी सुमारे 33 धावांची गरज होती. टिळक वर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार स्ट्राईकवर आला आणि येताच फाइन लेगला षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो पुन्हा शून्यावर बाद झाला. परंतु मुंबई इंडियन्सला त्याच्या फॉर्मची अजिबात चिंता नाही असे मुंबईचा फलंदाजी प्रशिक्षक पोलार्डने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT