IND vs ENG, Weather Report: भारत -इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! ओव्हर्स कमी करायला केव्हा होणार सुरुवात? पाहा वेळ
jos buttler with rohit sharma twitter
क्रीडा | T20 WC

IND vs ENG, Weather Report: भारत -इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! ओव्हर्स कमी करायला केव्हा होणार सुरुवात? पाहा वेळ

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलचा सामना सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिल्या सेमिफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

तर दुसऱ्या सेमिफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. दरम्यान पावसाचं आगमन झाल्यास षटकं कमी करायला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण.

षटकं कमी करायला केव्हा सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा सामना हा स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. राखीव दिवस नसल्याने या सामन्यासाठी बराच वेळ दिला गेला आहे. जर पाऊस आला आणि सुरुच राहिला, तर १२:१० नंतर षटकं कमी करायला सुरुवात होईल.

१०-१० षटकांचा सामना केव्हा सुरु होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली, तर १०-१० षटकांचा सामना खेळवण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी रात्री १:४४ पर्यंत कट ऑफ टाईम असणार आहे.

मात्र जर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही किंवा १० षटकांचा सामनाही होऊ शकला नाही, तर याचा फायदा भारतीय संघाला होणार आहे. सामना रद्द झाल्यास भारतीय संघाला थेट फायनलचं तिकीट मिळेल. कारण आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही .त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी असणारा संघ थेट फायनलसाठी पात्र ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : अंबरनाथ-बदलापुरात पावसाची हजेरी, ग्रामीण भागातील शेतकरी सुखावले

Mumbai Local Train : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा-आसनगाव लोकलसेवा ठप्प

Late Night Sleeping Side Effects : रात्री एक पर्यंत जागे राहाल तर आरोग्यावर गंभीर परिणाम, वाचा उशिरा झोपण्याचे तोटे

Kolhapur News: शाळेला जायची घाई, खोकल्याचं औषध समजून किटकनाशक प्यायला; ११ वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू

MS Dhoni Birthday Video: महेंद्रसिंग धोनीचा 43 वा वाढदिवस; वाढदिवसाच्या पार्टीला 'भाईजान' सलमान खानची हजेरी

SCROLL FOR NEXT