team india google
क्रीडा

T-20 World Cup,Live Streaming: क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! इथे पाहता येणार टीम इंडियाचे सामने फुकटात

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचे सर्व सामने डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहता येणार आहे. याबाबत अधिकृतरित्या घोषणा देखील करण्यात आली आहे.

प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यांसह विम्बल्डन आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धाही मोफत पाहता येणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. त्यानंतर २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकचा थरार रंगणार आहे. १ जुलै ते १४ जुलैदरम्यान विम्बल्डन स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघ ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेचंही थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर केलं जाणार आहे. ही मालिका ६ जुलै ते १४ जुलैदरम्यान खेळली जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ २७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान श्रीलंकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या मालिकेचं थेट प्रक्षेपणही डीडी स्पोर्ट्सवर केलं जाणार आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे सामने कधी?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा पुढील सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे. तर १२ जून रोजी भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT