Kedar Jadhav Retirement: T-20 WC सुरु असताना स्टार मराठमोळ्या क्रिकेटपटूची धोनी स्टाईलने निवृत्तीची घोषणा

Kedar Jadhav Retirement News: आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरु असताना स्टार भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Kedar Jadhav Retirement: T-20 WC सुरु असताना स्टार मराठमोळ्या क्रिकेटपटूची धोनी स्टाईलने निवृत्तीची घोषणा
indian cricket team google
Published On

सध्या अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यावर भर दिला गेला आहे. दरम्यान काही अनुभवी खेळाडूंचं भारतीय संघात कमबॅक करण्याचं दार बंद झालं आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु असतानाच भारताचा स्टार खेळाडू केदान जाधवने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे.

मराठमोळ्या केदार जाधवने एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची बातमी दिली आहे. त्याने धोनी स्टाईल निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने ज्यावेळी निवृत्ती जाहीर केली होती, त्यावेळी एक नोट शेअर केली होती.

केदार जाधवने वर्ल्डकप २०१९ स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. २०२० मध्ये तो भारतीय संघासाठी आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली नव्हती. संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत पाठिंबा आणि प्रेम दिल्याबद्दल त्याने क्रिकेट चाहंत्यांच आभार मानले आहे.

Kedar Jadhav Retirement: T-20 WC सुरु असताना स्टार मराठमोळ्या क्रिकेटपटूची धोनी स्टाईलने निवृत्तीची घोषणा
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

केदार जाधवच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १२२ धावा केल्या. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळण्याची संधी मिळाली. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरली. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. आयपीएल स्पर्धेत त्याला दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

Kedar Jadhav Retirement: T-20 WC सुरु असताना स्टार मराठमोळ्या क्रिकेटपटूची धोनी स्टाईलने निवृत्तीची घोषणा
IND vs IRE, Head To Head Record: टीम इंडियासमोर आयर्लंड संघाचं आव्हान! कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

केदार जाधवने ७३ वनडे सामन्यांमध्ये १३७९ धावा केल्या. ज्यात २ शतकं आणि ६ अर्धशतकांचा समावेश होता. तर आयपीएल स्पर्धेत त्याला ९५ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १२०८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकं झळकावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com