SA vs NED Saam TV
Sports

T-20 World Cup : नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचं 'पॅकअप'; भारत थेट सेमीफायनलमध्ये, पाकच्या आशा जिवंत

नेदरलँड्सने सुपर-१२ फेरीमध्ये सर्वांनाच आश्चर्यचकीत करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आहे.

Satish Daud

T-20 World Cup SA vs NED Match : टी-२० विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं. नेदरलँड्सने सुपर-१२ फेरीमध्ये सर्वांनाच आश्चर्यचकीत करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आहे. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ (Team India) आता थेट उपांत्यफेरीमध्ये पोहचला आहे. याशिवाय बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या सेमीफायनल फेरी गाठण्याच्या आशा देखील वाढल्या आहे. (Cricket News)

टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी नेदरलँड विरुद्ध दक्षिण आक्रिकेचा सामना पार पडला. हा सामना नेदरलँडसाठी इतका महत्वाचा नव्हता. कारण, नेदरलँडचा संघ यापूर्वीच स्पर्धेबाहेर झाला होता. मात्र, जाता-जाता त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाचं गणितही बिघडवलं. प्रथम फलंदाजी करताना, नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १५८ धावांचं आव्हान ठेवलं.

नेदरलँड्सकडून स्टीफन मायबर्ग (३७ धावा), मॅक्स ओ'डाऊड (२९ धावा) यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर टॉम कूपर (३५ धावा) व कॉलिन एकरमन (४१* धावा) यांनी फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला पार करून दिला.

दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य सहज पार करतील असेच वाटत होते. पण, नेदरलँड्सने कमाल करून दाखवली. दक्षिण आफ्रिकेने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडूंमध्ये २६ धावा हव्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ १२ धावा करता आल्या. अखेर आफ्रिकेला ८ बाद १४५ धावाच करता आल्या. आणि त्यांचा तब्बल १३ धावांनी पराभव झाला.

या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर असला, तरी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना जो संघ जिंकेल तो दक्षिण आफ्रिकेची जागा घेईल. विशेष म्हणजे भारताचा एक सामना बाकी असल्याने नेट रन रेटच्या जोरावर भारत पुढील फेरीसाठी पात्र ठरला आहे. भारत गृप ब मधून पात्र ठरणारा पहिला संघ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT