shahrukh khan saam tv
Sports

World Cup 2023: ICC ने शेअर केला वर्ल्डकप ट्रॉफीसोबत किंग खानचा फोटो; अवघ्या 30 मिनिटात पडला लाइक्सचा पाऊस

Shahrukh Khan With ICC Trophy: हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Shah Rukh Khan With ICC World Cup Trophy: क्रिकेट आणि बॉलिवूडचं खूप जुनं नातं आहे. अनेकदा क्रिकेट सामने पाहण्यासाठी बॉलिवूड स्टार्स हजेरी लावताना दिसून आले आहेत. यावेळी क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे.

या स्पर्धेपूर्वी बॉलिवूडचा किंग शाहरुख खान वर्ल्डकप ट्रॉफी सोबत दिसून आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Shahrukh Khan With ICC Trophy)

आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर बुधवारी (१९ जुलै) एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शाहरुख खानचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान आयसीसी वर्ल्डकप ट्रॉफीकडे हटके अंदाजमध्ये पाहताना दिसून येत आहे. यावेळी भारतीय संघ १९८३ आणि २०११ नंतर तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

नेटकऱ्यांच्या हटके प्रतिक्रिया..

या फोटोवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका युजरने शाहरूख खानचा प्रसिद्ध डायलॉग कमेंट करत लिहिले की, ' इतनी शिद्दत से तुम्हे चाहा है.. ' तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ' जर शाहरुख खान २०२३ मध्ये कमबॅक करू शकतो तर टीम इंडिया देखील कमबॅक करू शकते आणि वर्ल्डकप जिंकू शकते...' हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (Latest sports updates)

५ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ...

आगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत १० संघांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेतील १० सामने भारतातील १० शहरांमध्ये रंगणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध रंगणार आहे.

हा सामना चेन्नईच्या मैदानावर पार पडणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT