Richard Gould
Richard Gould Saam tv
क्रीडा | IPL

ICC Revenue Distribution: ICC च्या कमाईतील सर्वाधिक वाटा मिळणार BCCI ला! पाकिस्तानचा विरोध तर इंग्लंडने केलं समर्थन

Ankush Dhavre

Richard Gould: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने २०२३ -२७ साठी रेवेन्यू डिस्ट्रीब्यूशन मॉडेल प्रसिद्ध केलं होतं. या मॉडेलनुसार जगातील सर्वात श्रीमंत बोर्डपैकी एक असणाऱ्या बीसीसीआयला सर्वाधिक वाटा मिळणार आहे. हे मॉडेल प्रसिद्ध होताच अनेक चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

या मॉडेलनुसार बीसीसीआयला एकूण कमाईतील ३८.५ टक्के वाटा मिळणार आहे. त्यामुळे इतर देश यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसून येत आहेत. अशातच इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गौल्ड यांनी बीसीसीआयला पाठिंबा दिला आहे. मात्र मुख्य बाब अशी की, या मॉडेलला अजूनही मंजुरी मिळालेली नाही.

हा मॉडेल लागू केल्यास बीसीसीआयला मोठा फायदा होऊ शकतो. २०२३-२७ मॉडेलचा विचार केला तर बीसीसीआयला ६०० मिलियन अमेरीकन डॉलर्सच्या ३८.५ टक्के वाटा मिळणार आहे. म्हणजेच २३० मिलियन अमेरीकन डॉलर्स. तर इंग्लंडला ४१.३३ मिलियन डॉलर्स, ऑस्ट्रेलियाला ३७.५३ मिलियन अमेरिकन डॉलर्स तर पाकिस्तानला ३४.५१ मिलियन अमेरीकन डॉलर्स मिळणार आहेत. (Latest sports updates)

या मॉडेलनुसार,६०० मिलियन अमेरीकन डॉलर्सपैकी आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेल्या १२ संघांमध्ये ५८२.८४ मिलियन अमेरीकन डॉलर्स विभागले जाणार आहेत. तसेच सहसदस्य असलेल्या संघांमध्ये ६७.१६ मिलियन अमेरीकन डॉलर्स विभागले जाणार आहेत. या मॉडेलला पाकिस्तान क्रिकेट बोर्डने विरोध केला आहे. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गौल्ड हे बीसीसीआयच्या समर्थनात आहेत.

याबाबत बोलताना रिचर्ड गौल्ड यांनी म्हटले की, 'भारत त्यास पात्र आहे. कारण आयसीसीचा महसूल वाढवण्यात भारताचा वाटा खूप मोठा आहे. अशा परिस्थितीत, भारताला २३० मिलियन अमेरीकन डॉलर्ससाठी (१८८७ कोटी रुपये) पात्र आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की,' जगातील अन्य संघांप्रमाणेच भारतीय संघ देखील विदेश दौऱ्यावर जातो. जेव्हा हा संघ विदेश दौऱ्यावर जातो त्यावेळी यजमान संघाला मोठा महसूलही मिळवून देतो. त्यामुळे त्या गोष्टींचा विचार व्हायला हवा, असे मला वाटते.' असं गौल्ड म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ठाकरे गटाचे राजन विचारे आज लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार

T-20 WC 2024: मोठी बातमी! टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

High Blood Sugar : घाबरु नका! शरीरात सतत रक्तातील साखर वाढतेय? हे ४ उपाय लगेच करा

Sanjay Raut: 'वर्षा गायकवाड की नसीम खान', काँग्रेसने ठरवावं; संजय राऊत असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT