ICC ODI Ranking | मुंबई: आयसीसीनं (ICC) ताजी वनडे रँकिंग जाहीर केली आहे. फलंदाजांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पाकिस्तानचा कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज बाबर आझम अव्वलस्थानी कायम आहे.
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) यानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवुड यानं जबरदस्त कामगिरी केली आहे. तर भारताचा युवा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मोठा फटका बसला आहे. तो दोन स्थानांनी घसरला आहे. (Team India)
आयसीसीच्या रँकिंगमध्ये शुभमन गिलनं ४५ स्थानांनी झेप घेत थेट ३८ वे स्थान मिळवले आहे. २२ वर्षीय शुभमननं झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला फायदा झाला. हरारेमध्ये त्याने अवघ्या ९७ चेंडूंत १३० धावा कुटल्या.
माजी कर्णधार विराट कोहली झिम्बाव्बेविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही. तरीही तो पाचव्या स्थानी कायम आहे. तर कर्णधार रोहित शर्मा हा देखील झिम्बाव्बेविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही. तो सहाव्या स्थानी कायम आहे. शिखर धवननं झिम्बाब्वेविरुद्ध चांगला खेळ केला असला तरी, तो बाराव्या स्थानी आहे. त्याने तीन सामन्यांमध्ये एकूण १५४ धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
'हे' आहेत टॉप ५ फलंदाज
आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या वनडे टॉप फलंदाजांच्या यादीत भारताचा केवळ एकच फलंदाज आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम हा अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी वन डर दुसैं हा दुसऱ्या स्थानी, क्विंटन डी कॉक हा तिसऱ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानचा इमाम उल हक हा चौथ्या, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा पाचव्या स्थानी आहे.
टॉप ५ गोलंदाजांमध्ये भारताचा एकच गोलंदाज आहे. न्यूझीलंडचा तेजतर्रार गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा अव्वल स्थानी आहे. जोश हेजलवुड हा दुसऱ्या, मुजीब उर रहमान तिसऱ्या, जसप्रीत बुमराह हा चौथ्या स्थानी आहे. तर पाचव्या स्थानी पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.