pak vs ban twitter
Sports

ICC ODI Ranking: पाकिस्तान पिछाडीवर पण बाबर अन् आफ्रिदी आघाडीवर! ICC च्या यादीत गाठलं अव्वल स्थान

Shaheen Afridi ICC Ranking: आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या यादीत पाकिस्तानी खेळाडू अव्वल स्थानी आहेत.

Ankush Dhavre

Shaheen Afridi ICC Ranking:

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. आतापर्यंत त्याने केलेली ही सर्वात्तम कामगिरी आहे. रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहचण्यासाठी त्याने जोश हेजलवूडला मागे सोडलं आहे.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने पाकिस्तानच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्याने अवघ्या २३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीत १०० गडी बाद करण्याचा आकडा पूर्ण केला. असा कारनामा करणारा तो पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज ठरला आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतही त्याच्या गोलंदाजाची जादू पाहायला मिळाली आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अॅडम झाम्पासोबत संयुक्तरित्या अव्वल स्थानी विराजमान आहे. दोघांनी प्रत्येकी १६-१६ गडी बाद केले आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी तर फिरकीपटू कुलदीप यादव सातव्या स्थानी आहे. (Latest sports updates)

फलंदाजीत बाबर आझम अव्वल..

फलंदाजांमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या यादीत अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल दुसऱ्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत शाकीब हल हसन अव्वल स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT