pakistan cricket team  saam tv
Sports

ODI WC 2023: पाकिस्तानला भारतात यावच लागेल! नकार देणाऱ्या PCB ची ICC ने मोजक्या शब्दात चांगलीच जिरवली

Pakistan Cricket Board: पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार का? हा प्रश्न अजुनही कायम आहे

Ankush Dhavre

Pakistan Cricket Team ICC ODI World Cup 2023: आयसीसी वनडे वर्ल्ड कप सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मंगळवारी एका भव्य कार्यक्रमात आयसीसी आणि बीसीसीआयने मिळुन आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार का? हा प्रश्न अजुनही कायम आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने याबाबत कुठलीही माहिती दिली नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले की, आम्ही सामन्यांच्या ठिकाणांसह भारताच्या कोणत्याही दौऱ्यासाठी पाकिस्तान सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत. आम्ही पाकिस्तान सरकारच्या संपर्कात आहोत. पाकिस्तान सरकारकडून कुठलाही निर्णय आल्यानंतर आम्ही आयसीसीला कळवु.

आयसीसीने काय म्हटलं?

आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पाकिस्तानने वर्ल्ड कप खेळण्यासाठी करार केला आहे. आम्हाला आशा आहे की, ते हा करार न मोडता भारतात खेळण्यासाठी येतील. वर्ल्ड कप खेळणारे सर्व संघ आपल्या देशातील नियमांना बांधिल आहेत. याचा आम्ही आदर करतो. मात्र आम्हाला आशा आहे की, पाकिस्तान संघ वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार.' सध्या जॉर्ज बार्कले हे आयसीसीचे अध्यक्ष आहेत. (Latest sports updates)

पाकिस्तानने अफगाणिस्थान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआय आणि आयसीसीने ही मागणी फेटाळुन लावली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्थानविरूद्ध होणारा सामना बंगळुरूत तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणारा सामना चेन्नईत खेळवण्याची मागणी केली होती.

मात्र आता वेळापत्रक जाहीर होताच स्पष्ट झालं आहे की, अफगाणिस्थानविरूद्ध होणारा सामना हा चेन्नईत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणारा सामना हा बंगळुरूत खेळवला जाणार आहे.

भारत - पाकिस्तान सामना.. (India VS Pak Match Date)

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. यावेळी भारतात सामना रंगणार आहे. त्यामुळे नक्कीच भारतीय संघाचं पारडं जड असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

Maharashtra Live News Update: बीडमधून बीड - आहिल्यानगर रेल्वे धावली, मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर

Meenatai Thackeray Statue: हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे संतापले

Dharashiv : मुसळधार पावसाने नद्यांना महापूर; चांदणी नदीच्या पुरात तरुण वाहिला, पोलिसांना वाचविण्यात यश

SCROLL FOR NEXT