pakistan twitter
Sports

Champions Trophy: पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडणार? IND vs BAN सामन्यानंतर कसं आहे पॉईंट्स टेबल?

ICC Champions Trophy 2025 Points Table: भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर कसं आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पॉईंट्स टेबल? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा आहे. कारण १ सामना गमावल्याने संघ स्पर्धेतून बाहेरही फेकला जाऊ शकतो. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

या सामन्यात यजमान पाकिस्तानला ६० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. या २ सामन्यांनंतर गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. दरम्यान कोणता संघ कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार विजय मिळवून दमदार सुरुवात केली. मात्र तरीही भारतीय संघ अव्वल स्थानी पोहचू शकलेला नाही. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानला पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ या यादीत पहिल्या स्थानी आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे गुण २-२ आहेत. पण न्यूझीलंडचा नेट रनरेट +१.२०० इतका आहे. तर भारतीय संघाचा नेट रनरेट हा +०.४०८ इतका आहे.

तर बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. यजमान पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. आज ग्रुप बी चा पहिला सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर शनिवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडणार?

या स्पर्धेतील पहिलाच सामना बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजयाची नोंद केली. त्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशला धूळ चारली. आता पाकिस्तानचा पुढील सामना भारतीय संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अव्वल स्थानी जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र पाकिस्तानने जर हा सामना गमावला, तर पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT