आयपीएल २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा सुरु असताना आयसीसीने रँकिंगची घोषणा केली आहे. या यादीत भारतीय गोलंदाजांचं मोठं नुकसान झालं आहे. तर न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीचा मोठा फायदा झाला आहे.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत डफीने दमदार गोलंदाजी केली. या मालिकेत गोलंदाजी करताना त्याने १३ गडी बाद केले होते. या कामगिरीची दखल घेत आयसीसीने त्याला मोठं गिफ्ट दिलं आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये २ भारतीय गोलंदाजांचं नुकसान झालं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग १ स्थान मागे सरकला आहे. तर नवव्या स्थानाहून दहाव्या स्थानावर सरकला आहे. तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने सातव्या स्थानाहून सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. अर्शदीप सिंग टॉप १० मधून बाहेर होण्याच्या वाटेवर आहे.
या यादीतील टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत अकील हुसेन ७०७ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानी विराजमान आहे. तर भारताचा मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्ती ७०६ रेटींग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदील राशिद ७०५ रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. वानिंदु हसरंगा ७०० रेटींग पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. अॅडम झाम्पा ६९४ रेटींगसह पाचव्या स्थानी आहे.
आयसीसीच्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेड ८५६ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर ८२९ रेटींग पॉईंट्ससह अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसऱ्या, तिलक वर्मा चौथ्या आणि सूर्युकमार यादव पाचव्या स्थानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.