MS Dhoni Podcast saam tv
Sports

MS Dhoni: मी कधीच विचार केला नव्हता की...! निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी जरा स्पष्टच बोलला, केला मोठा खुलासा

MS Dhoni Podcast: ५ एप्रिल २०२५ रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात एक खास गोष्ट पाहायला मिळाली – धोनीचे आई-वडील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Surabhi Jayashree Jagdish

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिटायर कधी होणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही चाहत्यांना मिळालेलं नाही. दरम्यान आतापर्यंत धोनी स्पष्टपणे याबाबत बोलला देखील नाही. मात्र नुकतंच धोनीने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार आणि माजी भारतीय खेळाडू एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर एका पॉडकास्टमध्ये मोठं विधान केलं आहे.

झालं असं की, ५ एप्रिल २०२५ रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान एमए चिदंबरम स्टेडियममध्ये धोनीचे आई-वडील आले होते. त्यामुळे यंदाच्या आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेणार अशी अटकळ बांधण्यात येतेय. धोनीने त्याच्या आयपीएल निवृत्तीबाबत सर्व काही स्पष्ट केलंय. यासोबतच त्याने एक मोठा खुलासाही केला आहे.

धोनी यावर्षी घेणार का निवृत्ती?

राज शमानी यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये धोनीने निवृत्तीच्या अफवांबद्दल खुलासा केला. त्याने चाहत्यांना आश्वासन दिलंय की, तो यंदाच्या सिझननंतर त्याच्या आयपीएल कारकिर्दीला निरोप देणार नाहीये. ४४ व्या वर्षीही तो खेळू शकेल की नाही हे जाणून घेण्यासाठी तो त्याच्या शरीराला ८ महिने देणार आहे, असं धोनीने सांगितलं. पुढील सिझनच्या सुरुवातीला त्याचं शरीर खेळण्यासाठी योग्य असेल तर तो खेळत राहील.

रिटायरमेंटबाबत धोनी म्हणाला, नाही, आता नाही. मी अजूनही आयपीएल खेळतोय. मी ते एका वेळी एका वर्षाचा हिशोब घेतो. मी ४३ वर्षांचा असून २०२५ आयपीएल संपेपर्यंत मी ४४ वर्षांचा असणार आहे. त्यामुळे त्यानंतर मी पुढे खेळायचे की नाही हे ठरवण्यासाठी माझ्याकडे १० महिने आहेत. पण हे मी ठरवत नाही, तर माझे शरीर ठरवतं.

इंटरनॅशनल क्रिकेटमधून धोनीची निवृ्त्ती

ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तेव्हापासून तो फक्त आयपीएलमध्ये क्रिकेट खेळतो. धोनी त्याचा १८ वा आयपीएल सिझन खेळतोय पण चेन्नई सुपर किंग्जने ४ कोटी रुपयांना रिटेन केल्यानंतर अनकॅप्ड खेळाडू म्हणून हा त्याचा पहिलाच सिझन आहे.

देशासाठी खेळण्यावर काय म्हणाला धोनी?

धोनीच्या म्हणण्यानुसार, 'मी कधीही विचार केला नव्हता की मी देशासाठी खेळेन. मी रांचीमध्ये राहत होतो. आमच्या टीमचा क्रिकेट कारकिर्दीचा इतिहास नाही. मी शाळेत असताना कधीच विचार केला नव्हता की एक दिवस भारतासाठी खेळेन. आम्ही शाळेत असताना टेनिस बॉलने खेळायचो आणि मी त्यावेळी गोलंदाजी करायचो. मी त्यावेळी खूप लहान आणि बारीकही होतो. त्यानंतर मला विकेटकीपिंग करायला सांगण्यात आलं.

माझ्या वयाची खूप कमी मुलं त्यावेळी क्रिकेट खेळायची. माझ्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत क्रिकेट खेळणं माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. याशिवाय मी दुसरं काहीही केलं नाही. मला माझ्या वडिलांची खूप भीती वाटत होती. तो नेहमीच वेळेचे पक्के होते आणि मी देखील त्यांच्यासारखाच आहे, असंही धोनीने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT