hardik pandya twitter
Sports

Hardik Pandya: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सला रामराम करणार? ती पोस्ट तुफान चर्चेत

Hardik Pandya Instagram Story: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची एक स्टोरी तुफान चर्चेत आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya News In Marathi: आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सर्व फ्रेंचायझींना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे.

हार्दिक पंड्या गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. यावेळी मुंबई इंडियन्स त्याला रिटेने करणार की नाही,अशी चर्चा सुरु असताना हार्दिक पंड्याची इंस्टाग्राम स्टोरी तुफान चर्चेत आहे.

मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व

आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेतलं आणि नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरातने एका हंगामात जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. तर एका हंगामात फायनलपर्यंत मजल मारली.

मात्र तो फार गुजरातकडून खेळू शकला नाही. आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात घेतलं आणि रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिककडे सोपवली. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईचा संघ सर्वात शेवटी राहिला.

हार्दिकची स्टोरी तुफान व्हायरल

हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याने ,' मी एक मोठी घोषणा करणार आहे.. लवकरच सर्वांना कळेल..'असं लिहिलं आहे. हार्दिकची स्टोरी व्हायरल होताच, काहींनी या गोष्टीचा संबंध मुंबई इंडियन्स संघासोबत जोडला आहे. काही युझर्सच्या मते हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतो. मुंबईचं कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिकला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तो मोठा निर्णय घेऊ शकतो.

यासह आयसीसी टी-२० वर्ल्डकपपूर्वीच हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा भूकंप आला होता. त्याचा नताशासोबत घटस्फोट झाला. त्यानंतर त्याचं नाव ब्रिटीश सिंगरसोबत नाव जोडलं गेलं होतं. त्यामुळे हार्दिक पंड्या नव्या नात्याची नवी सुरुवातही करु शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. नेमकं कारण काय? हे लवकरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT